Sushil Kumar : पैलवान सुशील कुमार विरोधात ठोस पुरावे मिळाले, CCTV मध्ये सत्य उजेडात
CCTV फुटेजमध्ये सुशील कुमार सागर आणि अन्य दोन व्यक्तींना हॉकी स्टिकने मारहाण करताना पाहायला मिळत आहे.
नवी दिल्ली : दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये झालेल्या 23 वर्षीय सागर राणा हत्या प्रकरणात ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार विरोधात दिल्ली पोलिसांची छापेमारी सुरुच आहे. पोलिसांनी आरोपींचा पत्ता सांगणाऱ्यांना इनामही जाहीर केलयं. अशावेळी सुशील कुमारच्या अडचणी वाढताना पाहायला मिळत आहेत. कारण फॉरेन्सिक सायन्स लॅबने आपल्या अहवालात मोबाईलमधील व्हिडीओ फुटेज योग्य असल्याचं सांगितलंय. या व्हिडीओमध्ये सुशीलकुमार आपल्या साथीदारांसह सागर राणाला मारहाण करताना पाहायला मिळत आहेत. (CCTV evidence against Olympic medalist wrestler Sushil Kumar)
सुशीलकुमार विरोधात ठोस पुरावा
छत्रसाल स्टेडियमच्या CCTV फुटेजमध्येही सुशील कुमार आपल्या 20 ते 25 साथीदारांसह सागर धनखड आणि दोन अन्य व्यक्तींना मारहाण करताना दिसून आलाय. या CCTV फुटेजमध्ये सुशील कुमार सागर आणि अन्य दोन व्यक्तींना हॉकी स्टिकने मारहाण करताना पाहायला मिळत आहे. फॉरेन्सिक सायन्स लॅबने हा व्हिडीओही खरा असल्याचं म्हटलंय.
Sushil Kumar was seen at Meerut toll plaza: Delhi Police
Read @ANI Story | https://t.co/yOUydnODuI pic.twitter.com/PhtasLESaV
— ANI Digital (@ani_digital) May 20, 2021
थांगपत्ता सांगणाऱ्यास इमान जाहीर
पैलवान सागर राणा याची हत्या झाल्यापासून कुस्तीपटू सुशील कुमार परागंदा आहे. त्याच्यासह अन्य आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. सुशील कुमार आणि त्याचे साथीदार अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यावर मानसिक दबावाखाली येतील, असा पोलिसांचा अंदाज होता. त्याच वेळी, अटकेपासून वाचण्यासाठी सुशील कुमारने कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर एक लाखांच्या इनामाची घोषणा केली होती. तर त्याचा साथीदार अजयविषयी माहिती देणाऱ्यांना 50 हजारांचे इनाम मिळणार आहे.
Case relating to killing of Sagar Rana at Chhatrasal Stadium | Reward of Rs 1 Lakh on info leading to arrest of wrestler Sushil Kumar announced. Rs 50,000 reward announced for Ajay, who is absconding too: Delhi Police
Non-bailable warrant has been issued against Kumar & others. pic.twitter.com/0gsp04aStm
— ANI (@ANI) May 17, 2021
सागरच्या शरीरावर 50 हून अधिक जखमा
सुशील कुमार इतर पैलवानांच्या साथीने पूर्ण तयारीनिशी कुस्तीपटू सागर राणाला मारहाण करायला आला होता. पोस्टमार्टम अहवालानुसार सागरच्या छातीखेरीज इतर शरीरावर काठ्या आणि लोखंडी रॉडने वार केल्याच्या जखमा आहेत. त्याच्या शरीरावर 50 हून अधिक जखमा झाल्या आहेत. त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केले आहेत.
संबंधित बातम्या :
Sushil Kumar | पैलवान सुशील कुमारच्या शोधात पोलिसांची लूकआऊट नोटीस, सागर राणा मृत्यू प्रकरणात नाव
CCTV evidence against Olympic medalist wrestler Sushil Kumar