आयर्लंडच्या विकेटकीपरनं किंपींग करताना घातलं ‘आत्मघातकी हेल्मेट’, चेंडू लागला तर जीव गमवण्याची भीती!
करो या मरोच्या या आयर्लंंड विरुद्धच्या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतली. भारताने आयर्लंडसमोर विजयासाठी 156 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या सामन्यातीन निकालावर उपांत्य फेरीचं ठरणार आहे.
मुंबई : आयसीसी वुमन्स टी 20 वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध आयर्लंड सामना सुरु आहे. भारताला उपांत्य फेरीत धडक मारण्यासाठी हा सामना जिंकणं आवश्यक आहे. तर आयर्लंडचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. भारतानं प्रथम फलंदाजी करत 155 केल्या आणि विजयासाठी 156 धावांचं आव्हान ठेवलं आहे. असं असताना आयर्लंडची विकेटकीपर मॅरी वॉल्ड्रोन हिची जोरदार चर्चा रंगली आहे. वॉल्ड्रोन आत्मघातकी हेल्मेट घालून मैदानात उतरली होती. जर चुकून जोराचा चेंडू डोक्याला आदळला तर जीव जाण्याची शक्यता आहे. कारण हे हेल्मेट मात्र नाममात्र आहे. आयर्लंडची विकेटकीपर मॅरी वॉल्ड्रोन एक वेगळंच हेल्मेट घालून मैदानात उतरली.वर्ल्डकप स्पर्धेतील आतापर्यंतच्या समन्यात ती हेच हेल्मेट घालून उतरली होती.
2014 नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट पूर्ण हेल्मेट घालून विकेटकिपींग केलं आहे. त्यामुळे चेंडू लागून गंभीर दुखापत होण्याची शक्यता कमी असते. 2014 मध्ये ऑस्ट्रेलियन विकेटकिपर फिल ह्युज याचा चेंडू लागून मृत्यू झाला होता. त्यानंतर विकेटकीपर कानाच्या मागचा भाग कव्हर होईल असं हेल्मेट घालू लागले. पण जीवाची पर्वा न करता मॅरी वॉल्ड्रोन असं हेल्मेट घालून मैदानात उतरली होती.
Ireland keeper Mary Waldron wearing a new type of helmet.#INDvIRE #T20WorldCup pic.twitter.com/q9d0FWVEsD
— Drink Cricket (@Abdullah__Neaz) February 20, 2023
भारताचा डाव
भारताकडून सलामीला शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना ही जोडी मैदानात उतरली. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. मात्र शफाली वर्मा डेलनीच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका मारून बाद झाली. तिने 29 चेंडूत 24 धावा केल्या. त्यानंतर हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधानानं डाव सावरला. त्यानंतर हरमनप्रीत कौर 13 धावा करून तंबूत परतली. ती येत नाही तोच रोचा घोष मैदानात हजेरी लावून तंबूत हजर झाली. तिला आपलं खातही खोलता आलं नाही. त्यानंतर जेमिमानं स्मृतीसोबत चांगली खेळी केली. स्मृती मंधानाने 56 चेंडूत 87 धावा केल्या आणि बाद झाली. त्यानंतर दीप्ती शर्मा आली खरी पण भोपळाही फोडू शकली नाही. आयर्लंडकडून लॉरा डेलनीने 3, ओरला प्रेन्डरगास्टनं 2 आणि अरलेन केलीनं 1 विकेट घेतला.
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन) : स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (कीपर), देविका वैद्य, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकूर सिंग
आयर्लंड महिला (प्लेइंग इलेव्हन) : एमी हंटर, गॅबी लुईस, ओरला प्रेंडरगास्ट, एमियर रिचर्डसन, लुईस लिटिल, लॉरा डेलेनी (कर्णधार), आर्लेन केली, मेरी वॉल्ड्रॉन (कीपर), लेआ पॉल, कारा मरे, जॉर्जिना डेम्पसी