T20 World Cup : पाकिस्तानमध्ये आज सुट्टी, न्यूझीलंडकडून टी-20 वर्ल्डकप सेमीफायनलचा थरार वाढला
आज पाकिस्तान न्यूझिलंड यांच्यात सेमीफायनलची पहिली मॅच, पाकिस्तानमध्ये आज सुट्टी असल्यामुळे चाहत्यांचा उत्साह
नवी दिल्ली: विश्वचषक स्पर्धेतील (T20 World Cup 2022) सेमीफायनलची पहिली मॅच आज चाहत्यांना दुपारी दीड वाजल्यापासून पाहायला मिळणार आहे. आजच्या मॅचवर पावसाचं सावटं आहे. सिडनीच्या (sydney) मैदानात आज पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. आज न्यूझिलंड आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. न्यूझिलंड (NZ) टीमने आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. आजच्या मॅचमध्ये सुद्धा न्यूझिलंड टीम चांगली कामगिरी करेल अशी सोशल मीडियावर चर्चा आहे.
आज पाकिस्तानमध्ये सुट्टी आहे. त्यामुळे चाहत्यांना आज संपुर्ण मॅच पाहता येणार आहे. आजच्या सुट्टीमुळे चाहत्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. आज पाकिस्तानमध्ये डॉक्टर अल्लामा मोहम्मद इक्बाल यांचा 145 वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने संपुर्ण देशात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पाकिस्तानविरुद्ध न्यूझिलंड टीमचा पगडा भारी आहे असं आपण म्हणू शकतो. कारण न्यूझिलंड टीमने आतापर्यंतच्या विश्वचषक स्पर्धेत चांगली खेळी केली आहे.
Public holiday announced in Pakistan tomorrow on Wednesday, 9th November for Allama Iqbal Day. Enjoy the semifinal and keep praying ?#IqbalDay #T20WorldCup
— Farid Khan (@_FaridKhan) November 8, 2022
न्यूझीलंड टीम
केन विल्यमसन, मार्टिन गप्टिल, फिन ऍलन (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, अॅडम मिल्ने, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, टिम साउथी, डेव्हॉन कॉनवे, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम , ट्रेंट बोल्ट
पाकिस्तान टीम
बाबर आझम, आसिफ अली, हैदर अली, खुशदिल शाह, शान मसूद, मोहम्मद हारिस, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, मोहम्मद रिझवान, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी