T 20 : वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती, पाहा, T20चा संघ

29 जुलैपासून सुरू होणाऱ्या या पाच सामन्यांच्या मालिकेत विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. टी-20 किंवा वनडे मालिका खेळण्यासाठी तो वेस्ट इंडिजला जाणार नाही.

T 20 : वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती, पाहा, T20चा संघ
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 2:53 PM

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्धच्या (West Indies) टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. 29 जुलैपासून सुरू होणाऱ्या या पाच सामन्यांच्या मालिकेत विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. 29 जुलैपासून सुरू होणाऱ्या या पाच सामन्यांच्या मालिकेत विराट कोहलीला (Virat Kohli) विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते. आता तो टी-20 किंवा वनडे मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिजला जाणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. तर के. एल. राहुल आणि कुलदीप यादव यांचे संघात राहणे त्यांच्या फिटनेसवर अवलंबून असणार आहे. कोहलीशिवाय नंबर-1 वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही (Jasprit Bumrah) टी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल वनडेत बुमराहने 19 धावांत 6 विकेट घेतल्या होत्या. तसेच, शस्त्रक्रियेनंतर केएल राहुलचेही संघात पुनरागमन झाले आहे.

रविचंद्रन अश्विनचे संघात पुनरागमन

लेगस्पिनर युजवेंद्र चहललाही या मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी रवी बिश्नोईला संधी देण्यात आली आहे. तर रविचंद्रन अश्विनचेही संघात पुनरागमन झाले आहे. याशिवाय फिरकीपटू अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांचीही संघात निवड करण्यात आली आहे. के. एल. राहुलचा समावेश त्याच्या फिटनेसवर अवलंबून असणार आहे. राहुल आणि कुलदीपला फिटनेस टेस्ट उत्तीर्ण करावी लागणार आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठीचा भारतीय संघ

रोहित शर्मा (कप्तान), ईशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.

हे सुद्धा वाचा

ट्विट करत बीसीसीआयची माहिती

वेस्ट इंडिज विरुद्ध टी-20 मालिका

  1. 29 जुलै, पहिला T20
  2. 1 ऑगस्ट, दुसरा T20
  3. 2 ऑगस्ट, तिसरा T20
  4. 6 ऑगस्ट, चौथा T20
  5. 7 ऑगस्ट, पाचवा T20
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.