AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Australia 2020 | विराट कोहली वन डेमधील सर्वश्रेष्ठ खेळाडू, ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचकडून कौतुक

27 नोव्हेंबरपासून टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होत आहे.

India vs Australia 2020 |  विराट कोहली वन डेमधील सर्वश्रेष्ठ खेळाडू, ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचकडून कौतुक
| Updated on: Nov 26, 2020 | 6:14 PM
Share

सिडनी : सर्वच क्रिकेटचाहत्यांचं लक्ष आता टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India Tour Australia 2020) यांच्यातील एकदिवसीय मालिकेकडे (India vs Australia Odi Series) लागून राहिले आहे. शुक्रवार म्हणजेच 27 नोव्हेंबरपासून या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळला जाणार आहे. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळण्यात येणार आहे. विराट कोहली (Virat Kohli) टीम इंडियाचे तर अॅरोन फिंच (Aaron Finch) ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणार आहे. विराट हा महान खेळाडू आहे, अशी प्रतिक्रिया फिंचने दिली. पहिल्या सामन्याआधीच्या पत्रकार परिषदेत फिंचने ही प्रतिक्रिया दिली आहे. team india captain virat kohli is great player in odi cricket, said australia captain aaron finch

फिंच काय म्हणाला?

“विराट महान खेळाडू आहे. तो एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोतकृष्ट खेळाडू आहे. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर विराट परिपूर्ण खेळाडू आहे. एका क्रिकेटपटूमध्ये हवे असलेले सर्व आवश्यक गुण विराटमध्ये आहेत. त्याच्या रेकॉर्डच्या आसपासही कोणी नाहीये. विराटला बाद करण्याच्या हेतुने आम्हाला गोलंदाजी करावी लागेल. तसेच नियोजनानुसारच खेळ करावा लागेल. विराटला लवकर बाद केलं नाही, तर सामना आमच्या हातून निसटेल, अशी भितीही फिंचने व्यक्त केली.

विराटला विक्रमाची संधी

विराटला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2 विक्रम करण्याची संधी आहे. एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 25 वनडे सामन्यात 30.83 च्या सरासरीने 740 धावा केल्या आहेत. सचिनचा हा विक्रम मोडित काढण्यासाठी विराटला केवळ 112 धावांची आवश्यकता आहे. विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये 15 एकदिवसीय सामन्यात 44.92 च्या सरासरीने 629 धावा केल्या आहेत.

सर्वाधिक शतकं

विराटकडे सर्वाधिक शतकांच्या बाबतीत सचिनची बरोबरी करण्याची संधी आहे. सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात एकूण 9 शतकं लगावली आहेत. तर दुसऱ्याबाजूला विराटच्या नावावर 8 शतकांची नोंद आहे. त्यामुळे विराटला सचिनच्या शतकांची बरोबरी करण्यासाठी 1 तर विक्रम मोडित काढण्यासाठी 2 शतकी खेळींची आवश्यकता आहे.

एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

अशी आहे ऑस्ट्रेलियाची एकदिवसीय टीम : एरॉन फिंच (कर्णधार), सीन एबोट, एश्टन एगर, अॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, मोइजेस हेनरिक्स, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, डेनियल सॅम्स, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ , मिचेल स्टॉर्क, मार्कस स्टोयनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वार्नर आणि अॅडम झॅम्पा

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार&विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.

संबंधित बातम्या :

India Tour Australia | विराट कोहलीमुळे अ‌ॅडलेड कसोटीसाठी तिकीटांची मागणी वाढली

India vs Australia 2020 | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वन डे आणि T20 ची तिकीटं पहिल्याच दिवशी फुल

India vs Australia 1st ODI | भारत की ऑस्ट्रेलिया, वन डेमधील आकडे काय सांगतात?

team india captain virat kohli is great player in odi cricket, said australia captain aaron finch

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.