Happy Birthday Rohan Gavaskar | दिग्गज क्रिकेटपटूचा मुलगा, जो टीम इंडियाकडून खेळला पण भारतात नाही

रोहन गावसकरने (rohan gavaskar) एकूण 11 वनडे मॅचमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे.

Happy Birthday Rohan Gavaskar | दिग्गज क्रिकेटपटूचा मुलगा, जो टीम इंडियाकडून खेळला पण भारतात नाही
रोहन गावसकरने (rohan gavskar) एकूण 11 वनडे मॅचमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे.
Follow us
| Updated on: Feb 20, 2021 | 8:51 AM

मुंबई : आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करावं, असं प्रत्येक क्रिकेटपटूचं (Cricket) स्वप्न असतं. खेळाडू जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात पदार्पण करतो, तो क्षण त्याच्या आयुष्यातील अविस्मरणीय असतो. काही खेळाडू हे क्रिकेटमध्ये यशस्वी ठरतात. आपल्या बॅटिंग, बोलिंग आणि फिल्डिंग अशा तिनही आघाड्यांवर शानदार कामगिरी करतात. पण काही खेळाडूंच्या क्रिकेट प्रवासाला काही सामन्यांनंतर ब्रेक लागतो. अशीच काहीशी गोष्ट (Rohan Sunil Gavaskar) रोहन सुनील गावसकरची. रोहन गावसकरचा आज 45 वा वाढदिवस. रोहनचा आजच्याच दिवशी 1976 मध्ये कानपूरमध्ये जन्म झाला. रोहनच्या वाढदिवसानिमित्ताने आपण त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील कामगिरी आणि अन्य काही घटना पाहणार आहोत. (team india former player rohan gavaskar 45th birtday on 21 february 2021)

घरातूनच क्रिकेटचे बाळकडू

लिटील मास्टर अर्थात आपले सुनील गावसकर हे रोहनचे वडील. रोहनसाठी त्याचे वडील हे विद्यापीठापेक्षा कमी नव्हते. सुनील गावसकर हे तेव्हाचे पहिले दस हजारी धावा करणारे भारतीय फलंदाज होते. वडील क्रिकेटपटू असल्याने रोहनला लहानपणापासूनच घरातून क्रिकेटचे बाळकडू मिळाले. वडीलांकडूनच क्रिकेटची बाराखडी गिरवली. त्यामुळे रोहन लहानपणापासून क्रिकेटकडे ओढला गेला. तसेच टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू हे त्याचे नातेवाईक असल्याने त्यात आणखी भर पडली. माधव मंत्री आणि गुंडप्पा विश्वनाथ हे हे रोहनचे जवळचे नातेवाईक. त्यामुळे वडीलांसोबतच या दिग्गजांकडूनही क्रिकेटची अधिक माहिती मिळत गेली. त्यामुळे रोहनचा क्रिकेटकडचा ओढा वाढला.

रोहनचे वनडे डेब्यू

रोहनने क्रिकेटसाठी भरपूर मेहनत घेतली. ज्या दिवसाची वाट रोहन पाहत होता, तो दिवस अखेर उजाडला. टीम इंडिया तेव्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होती. ब्रिस्बेनवरील गाबामध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी नुकताच बॉर्डर गावसकर मालिकेतील अखेरच्या कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवला. त्याच मैदानात रोहनने ऑस्ट्रेलियाविरोधात 18 जानेवारी 2004 ला एकदिवसीय पदार्पण केलं. या पदार्पणातील सामन्यात रोहनला फार खेळण्याची संधी मिळाली नाही. यामुळे रोहनला नाबाद 2 धावाच करता आल्या.

रोहनला बॅटिंगने कमाल करण्याची संधी मिळाली नाही. पण रोहनने बोलिंग करताना पहिल्याच सामन्यात पहिली विकेट मिळवली. रोहनने आपल्याच बोलिंगवर ऑस्ट्रेलियाच्या अँड्रयू सायमंडला 20 धावांवर कॅच आऊट केलं. रोहनने या सामन्यात एकूण 9 ओव्हर बोलिंग केली. यामध्ये त्याने 56 रन्स देत सायमंडची एकमेव विकेट घेतली. रोहनच्या वनडे कारकिर्दीतील हे पहिली आणि अखेरची अशी एकमेव विकेट ठरली.

रोहनची एकदिवसीय कारकिर्द

रोहनची वनडे कारकिर्द ही दुर्देवाने लोकल रेल्वेपेक्षाही लहान ठरली. रोहन आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत फक्त 11 सामनेच खेळला. यामध्ये त्याने 64.53 स्ट्राईक रेटसह 1 अर्धशतकासह 151 धावा केल्या. 54 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली.

जगभर फिरला पण घरी नाय खेळला

रोहन आपल्या वनडे कारकिर्दीत सामन्याच्या निमित्ताने जगभर फिरला. त्याने ऑस्ट्रेलियापासून ते इंग्लंड आणि नेदरलंड पर्यंतचा प्रवास केला. पण तो एका बाबतीत फार कमनिशीबी किंवा दुर्देवी ठरला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपल्या होम ग्राऊंडवर एकतरी सामना खेळावा, अशी प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. पण रोहनची ही इच्छा पूर्ण झाली नाही. म्हणजेच रोहनने सर्वच्या सर्व सामने हे परदेशात खेळले.

अवघ्या 9 महिन्यांची एकदिवसीय कारकिर्द

रोहनची वनडे कारकिर्द ही अवघ्या 9 महिन्यांची ठरली. रोहनने जानेवारी 2004 मध्ये कांगारुंविरुद्ध पदार्पण केलं. तर 19 सप्टेंबर 2004 ला पाकिस्तान विरुद्ध खेळण्यात आलेला सामना हा रोहनच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरला.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये हिट

रोहन आंतरराष्ट्रीय क्रिकेट फार यशस्वी ठरला नाही. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये रोहन  यशस्वी ठरला. रोहनने 117 प्रथम श्रेणी सामन्यात त्याने 6 हजार 938 धावा केल्या. तर रणजी करंडकादरम्यानच्या 2 वर्ष बंगालचे नेतृत्व केलं. दरम्यान रोहनने सक्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने आपला मोर्चा समालोचनाकडे वळवला आहे.

संबंधित बातम्या :

Aakash Chopra | ….म्हणून मुंबई इंडियन्सने Arjun Tendulkar ला आपल्या ताफ्यात घेतलं, आकाश चोप्राने सांगितलं कारण

IPL Chennai Super Kings Team 2021 | धोनीच्या टीममध्ये ‘हे’ 2 अष्टपैलू खेळाडू, चेन्नई पुन्हा कमबॅक करण्यासाठी सज्ज, पाहा पूर्ण टीम

(team india former player rohan gavaskar 45th birtday on 21 february 2021)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.