“टीम इंडियाचे खेळाडू इंजेक्शन..”, चीफ सिलेक्टर चेतन शर्मा यांचा धक्कादायक खुलासा

बीसीसीआयचे चीफ सिलेक्टर चेतन शर्मा यांच्या स्टिंग ऑपरेशननं एकच खळबळ उडाली आहे. संघातील खेळाडू फिट राहण्यासाठी काय करतात याबाबत त्यांनी यात सांगितलं आहे. त्याचबरोबर काही खेळाडूंच्या निवडीवरून दबाव असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

टीम इंडियाचे खेळाडू इंजेक्शन.., चीफ सिलेक्टर चेतन शर्मा यांचा धक्कादायक खुलासा
टीम इंडियाच्या खेळाडूंबाबत चेतन शर्मा यांचा धक्कादायक खुलासा, इंजेक्शनबाबत मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 9:40 PM

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे चीप सिलेक्टर चेतन शर्मा यांच्या धक्कादायक खुलाशानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी भारतीय संघातील खेळाडूंवर गंभीर आरोप केले आहेत. काही खेळाडू फीट अँड फाईन राहण्यासाठी इंजेक्शन घेत असल्याचा आरोप केला आहे. चेतन शर्मा यांची नुकतीच चीफ सिलेक्टरपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. एका खासगी चॅनेलच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हा धक्कादाखक खुलासा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे चेतन शर्मा यांनी जसप्रीत बुमहाहची दुखापत आणि खेळाडूंना संघाबाहेर राहणं भीतीदायक वाटत असल्याचं देखील सांगितलं आहे.

भारतीय संघातील खेळाडू गेल्या काही दिवसांपासून फिटनेसमुळे आत बाहेर होत आहेत. खासकरून गेल्या वर्षी संघातील वरिष्ठ खेळाडू दुखापतीमुळे खेळू शकले नव्हते. तर काही खेळाडूंनी संघात पुनरागमन करून दुखापतग्रस्त असल्याचं पाहीलं गेलं आहे. त्यामुळे खेळाडूंचा फिटनेस वारंवार खराब का होत आहे? असा प्रश्न पडतो. मात्र चेतन शर्मा यांच्या स्टिंग ऑपरेशननंतर धक्कादायक माहिती समोर आला आहे.

चेतन शर्मा यांचे स्टिंग ऑपरेशनमधील आरोप

  • अनफिट खेळाडू फिट दिसण्यासाठी फेक इंजेक्शन घेतात.
  • पेन किलर इंजेक्शन घेत नाही कारण त्यासाठी डॉक्टरची प्रिस्क्रिप्शन लागते. तसेच डोपिंगमध्ये पकडले जाऊ शकतात.
  • डॉक्टरांना बोलवून इंजेक्शन घेतात. यामुळे डोप टेस्टमध्ये पडकले जाऊ शकत नाही.
  • जसप्रीत बुमराह झालेली जखम मोठी आहे. एक सामना आणखी खेळला असता तर पूर्ण वर्षभरासाठी बाहेर गेला असता.
  • प्रत्येक खेळाडूला संघाबाहेर जाण्याची भीती सतावत आहे. यासाठी इंजेक्शन लावून फीट राहतात.
  • कोणताही खेळाडू संघातील स्थान सोडू इच्छित नाही. यासाठी इंजेक्शन घेऊन स्वत:ला फीट ठेवतात.
  • संजू सॅमसंगबाबत सिलेक्टर्स दबावात आहेत.

कोण आहेत चेतन शर्मा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाद्वारे 7 जानेवारी 2023 नव्या निवड समितीची घोषणा करण्यात आली.या समितीत पुन्हा एका माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा यांची चीफ सिलेक्टर म्हणून निवड करण्यात आली आहे. चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली मागील सिलेक्शन समितीला दोनदा टी 20 वर्ल्डकप पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर बीसीसीआयने नवी सिलेक्शन समितीची बनवण्याची घोषणा केली होती. मात्र पुन्हा त्यांची नियुक्ती करण्यात आली.

Non Stop LIVE Update
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्.
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?.
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.