भारतीय संघाच्या ‘या’ सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश मिळणार?

जगभरात अनेक ठिकाणी मॉल्स, रेल्वे, चित्रपटगृह, नाट्यगृह सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे आता स्टेडियममध्ये प्रेक्षकांनाही प्रवेश दिला जाऊ शकतो.

भारतीय संघाच्या 'या' सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश मिळणार?
Follow us
| Updated on: Nov 19, 2020 | 11:08 AM

लंडन : जगभरात कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. काही देशांमध्ये परिस्थिती नियंत्रणात येत होती, परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे काही देश पुन्हा लॉकडाऊनचा विचार करत आहेत. अशातच जगभरात सुरु असलेल्या अनेक क्रीडास्पर्धा प्रेक्षकांविना भरवल्या जात आहेत. नुकतीच झालेली आयपीएल 13 स्पर्धादेखील प्रेक्षकांविना खेळवण्यात आली. आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला (India Tour of Australia) आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. हे सामनेदेखील प्रेक्षकांविना खेळवले जाणार आहेत. दरम्यान जगभरात अनेक ठिकाणी मॉल्स, रेल्वे, चित्रपटगृह, नाट्यगृह सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे आता स्टेडियममध्ये प्रेक्षकांनाही प्रवेश दिला जाऊ शकतो. (Team India’s tour of England announced, Spectators will get entry into the stadium)

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) पुढील वर्षी (2021) भारताविरोधात होणाऱ्या क्रिकेट मालिकेचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. ऑगस्ट-सप्टेंबरदरम्यान टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया एकूण 5 कसोटी सामने खेळणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये प्रेक्षक दिसू शकतात. प्रेक्षकांना स्टेडियममध्ये पुन्हा आणण्याबाबत ईसीबीचा विचार सुरु आहे.

इंग्लंडने या वर्षी कोव्हिड-19 च्या प्रादूर्भावामुळे प्रेक्षकांविना वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानविरुद्ध वेगवेगळ्या कसोटी मालिका खेळवल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकांचे प्रेक्षकांविना यशस्वी आयोजन केले होते. आता ईसीबी पुढील वर्षी भारताविरुद्ध मालिकांचं आयोजन करणार आहे, दरम्यान यावेळी प्रेक्षकांना पुन्हा स्टेडियममध्ये प्रवेश देण्याबाबत सध्या विचार सुरु आहे.

ईसीबीने जारी केलेल्या एका निवदेनात म्हटले आहे की, प्रेक्षकांना पुन्हा स्टेडियममध्ये एंट्री देण्याबाबत विचार सुरु आहे. पुढील वर्षी बोर्डाने विविध क्रिकेट मालिकांचे आयोजन केले आहे. यामध्ये भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेचाही समावेश आहे. भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडमध्ये येणार आहे. या मालिकेदरम्यान प्रेक्षकांना पुन्हा स्टेडियममध्ये प्रवेश देण्याबाबत विचार सुरु आहे.

इंग्लंडिरुद्धच्या कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिली टेस्ट : 4 ते 8 ऑगस्ट, ट्रेंट ब्रिज दुसरी टेस्ट : 12 ते 16 ऑगस्ट, लॉर्ड्स तिसरा टेस्ट : 25 ते 29 ऑगस्ट, हेडिंग्ले चौथाी टेस्ट : 2 ते 6 सप्टेंबर, ओव्हल पाचवी टेस्ट : 10 ते 14 सप्टेंबर, ओल्ड ट्रॅफर्ड

दरम्यान, टीम इंडियाचा 2021 मधील भरगच्च कार्यक्रम जाहीर झाला आहे. यानुसार टीम इंडिया आगामी वर्षात एकूण 14 कसोटी, 16 एकदिवसीय आणि 23 टी-20 सामने खेळणार आहे. तसेच 2021 मध्ये टी-20 वर्ल्ड कप स्पर्धाही खेळवण्यात येणार आहे. तसेच नेहमीप्रमाणे खेळवण्यात येणाऱ्या आयपीएल स्पर्धेचाही समावेश असणार आहे.

सध्या टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट 19 जानेवारीला होणार आहे. यानंतर टीम इंडिया भारतात परतणार आहे. टीम इंडिया भारतात इंग्लडविरुद्ध खेळणार आहे. इंग्लंड 2021 मध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात इंग्लंड टीम इंडियाविरुद्ध प्रत्येकी 4 कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 सामने खेळणार आहे. इंग्लंडचा हा एकूण 3 महिन्यांचा लांबलचक दौरा आहे.

संबंधित बातम्या

India Future Tour Program 2021 | आशिया चषक, इंग्लंड दौरा, T 20 वर्ल्ड कप, टीम इंडियाचा 2021 मध्ये भरगच्च दौरा, पाहा संपूर्ण वेळापत्रक

कोरोनामुळे मोठा फटका, भारतात पुढच्या वर्षी होणारा वर्ल्ड कप रद्द

(Team India’s tour of England announced, Spectators will get entry into the stadium)

Non Stop LIVE Update
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.