Live सामन्याच्या मध्यावर एका मुलाने डेव्हिड वॉर्नरकडे मागितला शर्ट, अॅडलेडमध्ये पुन्हा दिसला ‘दयाळूपणा’
लाइव्ह मॅचमध्ये वॉर्नरने जर्सी काढायला सुरुवात केली, मुलाच्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल
मुंबई : ऑस्ट्रेलियात विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धा नुकतीच संपली. पाकिस्तान टीमचा (PAK) पराभव करुन इंग्लंडच्या (ENG) टीमने बाजी मारली. त्याच मैदानावर सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात काल एकदिवसीय सामना झाला. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी चांगली खेळी केल्यामुळे इंग्लंड टीमचा पराभव झाला. कालच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया टीमचा स्टार फलंदाज डेविड वॉर्नर याने 86 धावांची महत्त्वपुर्ण खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया टीमचा विजय झाला. डेविड वॉर्नरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात काल 50 ओव्हरची मॅच अॅडलेडच्या मैदानात झाली. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू डेविड वॉर्नर याच्याकडे एका लहान चाहत्याने जर्सी मागितली. छोट्याशा चाहत्याने डेविड वॉनरकडे कागदावर मॅसेज लिहून जर्सी मागितली. त्यानंतर डेविड वॉनर एकदम भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. त्याने हाताने इशारा करीत मिळू शकते असं दर्शविलं. त्यामुळे मैदानात पुन्हा चाहत्यांचा जल्लोष पाहायला मिळाला.
What a rollercoaster! #AUSvENG @davidwarner31 @marnus3cricket pic.twitter.com/gFnke3Gctw
— cricket.com.au (@cricketcomau) November 17, 2022
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पैट कमिंस याने टॉस जिंकून इंग्लंड टीमला फलंदाजी करण्यास सांगितले. 50 ओव्हरमध्ये इंग्लंडच्या टीमने 287 धावा केल्या. त्यामध्ये डेविड मलान या खेळाडूने 134 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलिया टीमने डेविड वॉर्नर 86, स्टीव स्मिथने नाबाद 80, ट्रेविस हेडने 69 धावांची खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा विजय झाला.