या क्रिकेटरवर दुःखाचा कोसळला डोंगर, ब्रेन स्ट्रोकमुळे वडील रुग्णालयात
Deepak Chahar | T-20 India-Australia दरम्यान या क्रिकेटपटूला रुग्णालयात धाव घ्यावी लागली. ब्रेन स्ट्रोकमुळे त्याच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करावे लागले. वडिलांच्या प्रेरणेने आणि पाठिंब्यामुळेच भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळाले. आता बाबांची काळजी घेणार असल्याचे तो म्हणाले. त्यामुळे सर्व फॅन्सीने त्याचे कौतूक केले.
नवी दिल्ली | 6 डिसेंबर 2023 : भारतीय संघातील ऑलरॉऊंडर दीपक चाहर सध्या काळजीत आहे. त्याचे वडील लोकेंद्र चाहर यांना अचानक ब्रेन स्ट्रोक आला. त्यांना तातडीने अलिगढ येथील रामघाट रोडवरील मिथराज रुग्णालयात भरती करण्यात आले. एका लग्नसोहळ्यासाठी ते अलिगढला आले होते. हे वृत्त धडकताच दीपक, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या टी-20 च्या शेवटचा सामना सोडून अलिगडला पोहचला. वडिलांच्या प्रेरणेने आणि पाठिंब्यामुळेच भारतीय संघात स्थान मिळाले, आता त्यांची काळजी घेणार असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे सर्व फॅन्सीने त्याचे कौतूक केले आहे. त्याच्या वडीलांच्या तब्येतीत सुधारणा झाली असली तरी अजून धोका टळलेला नाही. त्याचे कुटुंबिय आणि नातेवाईकांनी पण रुग्णालयात धाव घेतली आहे.
वडिलांची लागली काळजी
दीपक चाहरने सामना अर्धवट सोडून रुग्णालयात धाव घेतली. त्याच्या वडीलांच्या आरोग्यात सुधारणा आहे. पण ते अजून धोक्याच्या बाहेर नाहीत. दीपक आता त्यांची देखभाल करत आहे. त्याला वडिलांची काळजी लागली आहे. क्रिकेट सामन्यांसोबत वडील पण महत्वाचे आहे. वडिलांमुळेच भारतीय संघात असल्याचे तो म्हणाला.
सामना सोडावा लागला
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी 20 चा अंतिम सामना होता. बेंगळुरुमध्ये हा सामना झाला. पण वडिलांचे हे वृत्त कळताच त्याने रुग्णालयाकडे धाव घेतली. लोकेंद्र सिंह शनिवारी एका लग्नासाठी अलिगड येथे आले होते. संध्याकाळी त्यांना ब्रेन स्ट्रोक आला. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आला. दीपक हा मुळचा आग्रा येथील आहे. त्याचे कुटुंबिय आणि नातेवाईक पण रुग्णालयात पोहचले आहे.
आरोग्यात सुधारणा
मिथराज हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र वार्ष्णेय यांनी लोकेंद्र सिंह यांच्या आरोग्यात सुधारणा असल्याचे सांगितले. त्यांना ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. आज क्रिकेट जगतात आपण जे नाव कमावले आहे, ते वडीलांमुळेच असल्याचे दीपकने सांगितले. क्रिकेट इतकेच वडील पण महत्वाचे असल्याचे त्याने सांगितले.