Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवच्या ट्विटवर या महिला क्रिकेटरने दिलं मजेशीर उत्तर, चाहते म्हणाले…

सुर्यकुमार यादव सोशल मीडियावर अधिक सक्रीय असतो.

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवच्या ट्विटवर या महिला क्रिकेटरने दिलं मजेशीर उत्तर, चाहते म्हणाले...
Suryakumar-yadavImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Nov 15, 2022 | 9:51 AM

मुंबई :  टीम इंडियाचा स्टार फलंदाज सुर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) चांगल्या गोलंदाजांची धुलाई केली. त्यामुळे त्याच्या कामगिरीची अधिक चर्चा होती. तसेच यादवला गोलंदाजी करताना अनेक गोलंदाजांना घाम फुटत होता, कारण सुर्यकुमार यादव चौफेर फटकेबाजी करीत होता. विश्वचषक स्पर्धेत कमी बॉलमध्ये अधिक धावा काढून त्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. विशेष म्हणजे इंग्लंडच्या टीमने सेमीफायनलच्या (Semifinal) मॅचमध्ये त्याला बाद करण्यासाठी स्पेशल बैठक घेतली होती.

सुर्यकुमार यादव सोशल मीडियावर अधिक सक्रीय असतो. त्याचबरोबर अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करीत असतो. टीम इंडिया न्यूझिलंड दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचे आवाहन संपुष्टात आल्यानंतर तिथून थेट खेळाडू न्यूझिलंडला रवाना झाले. तिथं पोहोचल्यानंतर सुर्यकुमार यादवने एक ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये “हॅलो वेलिंगटन” असं लिहिलं आहे.

हे सुद्धा वाचा

सुर्यकुमार यादवचं ते ट्विट अधिक व्हायरल झालं आहे. चाहते सुर्यकुमार यादवची अधिक मजा घेत आहेत. टी20 मालिकेतील पहिली मॅच टीम इंडियाची 18 नोव्हेंबरला न्यूझिलंडविरुद्ध वेलिंगटन शहरात होणार आहे. तिथं पोहोचल्यानंतर टीम इंडियाने “हॅलो वेलिंगटन” असं लिहिलं आहे.

सुर्यकुमार यादवच्या ट्विटची ऑस्ट्रेलिया महिला टीमची खेळाडू अमांडा जेड वेलिंगटन हीने मजा घेतली आहे. त्यामध्ये विशेष असं आहे की, अमांडा जेड वेलिंगटन हीचं अडनाव “वेलिंगटन” असं आहे. त्यामुळे तिने सुर्यकुमार यादव उत्तर दिलं आहे. त्यामध्ये ‘हॅलो यादव’ असं लिहिलं आहे.

कालपासून सोशल मीडियावर चाहते या ट्विटची मजा घेत आहेत. सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध पराभव झाल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंवरती टीका करण्यात आली होती. न्यूझिलंडच्या दौऱ्यात कशी कामगिरी करणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.