Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : वक्तव्याचा चूकीचा अर्थ काढणाऱ्यांना नीरजने सुनावलं, व्हिडीओ शेअर करत घेतली पाकिस्तानी खेळाडूची बाजू

टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भारताच्या नीरज चोप्रासह पाकिस्तानच्या अशरफ नदीमनेही सहभाग घेतला होता. नदीम अंतिम सामन्यात पाचव्या स्थानावर राहिला.

VIDEO : वक्तव्याचा चूकीचा अर्थ काढणाऱ्यांना नीरजने सुनावलं, व्हिडीओ शेअर करत घेतली पाकिस्तानी खेळाडूची बाजू
नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम
Follow us
| Updated on: Aug 26, 2021 | 6:13 PM

नवी दिल्ली : भारताला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2021) सुवर्णपदक मिळवून देणारा नीरज चोप्रा (Neeraj Chopra) हा त्याच्या खेळासह साध्या आणि सरळ व्यक्तीमत्त्वासाठीही ओळखला जातो. मुलाखतींमध्ये साधं सोपं इंग्रजी शक्य असेल तिथे विनंती करुन हिंदी बोलणारा नीरज जितका दिसायला छान आहे तितकाच त्याचा स्वभावही छान आहे. त्याच्या व्यक्तीमत्त्वातील आणखी एक सुवर्णगुण सर्वांसमोर आला आहे. पाकिस्तानचा भालाफेकपटू अरशद  नदीम (Ashrad Nadeem) एका नीरजच्या वक्तव्यांवरुन ट्रोल होत असताना नीरजने मध्ये पडत अरशदची बाजू घेतली आहे

नीरज हा सुवर्णपदक विजयानंतर सतत विविध ठिकाणी मुलाखत देत आहे. अशाच एका मुलाखतीत त्याने ऑलिम्पिकमधील एक किस्सा शेअर केला. त्याचा प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा भालाफेकपटू अरशद नदीमसोबत घडलेला एक किस्सा त्याने सांगितलं. ज्यानंतर काही नेटकऱ्यांनी त्याचा चूकीचा अर्थ काढत नदीमला ट्रोल करण्यास सुरुवात केली. ज्यानंतर नीरजला खास एक व्हिडीओ तयार करुन सर्व प्रकरण नीट समजवावं लागलं आणि नदीमला सुनावण्यापासून भारतीय चाहत्यांना थांबवाव लागलं.

नेमकं काय घडलं होतं?

नीरजने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितलं की,‘मी टोक्यो ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये माझा पहिला थ्रो करण्यापूर्वी माझा भाला शोधत होतो. तेव्हा मी पाहिलं पाकिस्तानचा नदीम माझा भाला घेऊन फिरत आहे. त्यावेळी मी त्वरीत त्याच्याकडून भाला घेत मला थ्रो करायला जायचं आहे, असं सांगितलं. याच कारण ऑलिम्पिकमध्ये थ्रोच्या ठरलेल्या वेळा असतात त्या न पाळल्यास तुम्हाला बाद केलं जाऊ शकतं. त्यामुळे मी पटकन त्याच्याकडून भाला घेत पहिला थ्रो अत्यंत गडबडीत केला.’

नदीमची बाजू घेत नीरजने शेअर केला VIDEO

हा किस्सा नीरजने सांगताच नदीमला खूप ट्रोल केलं जाऊ लागलं. त्याच्यावर अनेक टीका भारतीय चाहते करु लागले. नीरजला हे पटलं नाही आणि त्याने त्याच्या ट्विटरवरुन एक व्हिडीओ शेअर करत इंडियन फॅन्सना एक खास विनंती केली. नीरज म्हणाला, ‘मी जो काही किस्सा सांगितला त्यानंतर नदीमला फार वाईट सुनवलं जात आहे. पण मुळात त्याने कोणतीही चूकीच गोष्ट केली नव्हती. भालाफेकच्या नियमांनुसार कोणताही खेळाडू कोणाचाही भाला वापरु शकतो. त्यामुळे नदीमवर टीक करण्याआधी तुम्ही नियम वाचा, तसंच खेळांमधून एकमेंकासोबत चांगेल संबध प्रस्थापित करणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे माझी विनंती आहे माझ्या वक्तव्याचा चूकीचा अर्थ काढण्याआधी नियम वाचा आणि समजून घ्या’

इतर बातम्या

सोनेरी भालाफेक करणाऱ्या नीरज चोप्राचं ‘मराठा’ कनेक्शन माहित आहे का? भालाफेक तर रक्तात

सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव, कोट्यवधीच्या रोख रकमेसह गाडी आणि बरंच काही

Video: जेव्हा टोकियोच्या मैदानावर तिरंगा फडकला, राष्ट्रगीतानं मैदान दुमदुमलं, पहा गोल्डन बॉय नीरजचा भावूक क्षण

(Indian gold medal winner Neeraj Chopra appeals fans not to troll pakistans arshaf nadeem without knowing the javelin throws rules)

टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे.
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्...
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्....
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी.
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार.
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं.
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?.
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर.
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं.
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका.
दौलताबादच्या देवगिरी किल्ल्याला भीषण आग; ऐतिहासिक वास्तुचं मोठं नुकसान
दौलताबादच्या देवगिरी किल्ल्याला भीषण आग; ऐतिहासिक वास्तुचं मोठं नुकसान.