Tokyo Paralympics: भारताने उघडलं विजयाचं खातं, टेबल-टेनिसपटू भाविना पटेल दुसऱ्या सामन्यात विजयी
भारताचे टोक्यो पॅरालिम्पिक्समधील सामने सुरु झाले आहेत. पहिल्या दिवशीच्या सामन्यात पराभव पत्करल्यानंतर टेबल-टेनिसपटू भाविना पटेल दुसऱ्या सामन्यात विजयी झाली आहे. यासोबतच भारताने स्पर्धेतील पहिला विजयही मिळवला आहे.

Tokyo Paralympics 2020: टोक्यो पॅरालिम्पिक 2020 (Tokyo Paralympics-2020) स्पर्धेत गुरुवारी भारताने पहिला विजय मिळवला आहे. भारताची महिला टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेलने (Bhavinaben Patel) क्लास-4 च्या ‘ग्रुप-ए’ मधील आपला दुसरा सामना जिंकत हा विजय मिळवला. ब्रिटेनच्या मेगन शॅकक्लेटनला नमवत भाविनाने हा विजय मिळवला. चार सेट्सपैकी तीन सेट्स जिंकत भाविनाने सामना आपल्या नावे केला. त्यामुळे भारताने सामना 3-1 अशा तगड्या फरकाने जिंकला.
असा झाला सामना
सामन्यात भाविनाने पहिला सेट 11-7 च्या फरकाने जिंकला. ज्यानंतर दुसऱ्या सामन्यात प्रतिस्पर्धी मेगनने पुनरागमन करत 11-9 ने सेट जिंकत सामन्यात 1-1 ची बरोबरी साधली. ज्यानंतर भाविनाने मेगनला एकही संधी न देता सर्व उर्वरीत सेट्स जिंकले. तिसरा सेट भाविनाने 17-15 च्या फरकाने जिंकला. ज्यानंतर अखेरचा सेट ही अत्यंत चुरशीचा झाला ज्यामध्ये मेगनने जिंकण्यासाठी खूप मेहनत घेतली. पण भाविनाने अप्रतिम खेळ करत 13-11 च्या फरकाने सेट जिंकत सामनाही खिशात घातला.
India’s ace para-paddler @BhavinaPatel6 will begin her second group match shortly
Watch this space for updates and continue to send in your #Cheer4India messages#Praise4Para #ParaTableTennis#Paralympics pic.twitter.com/rX4GfOSMWJ
— SAI Media (@Media_SAI) August 26, 2021
सोनलबेनची झुंज अपयशी
टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये पहिल्या दिवशी झालेल्या टेबल टेनिसपटू सोनलबेनच्या सामन्यात तिला पराभव पत्करावा लागला होता. सोनलबेनने सामन्यात सुरुवातीला चांगली आघाडी मिळवली होती. पहिल्या तीन गेमनंतर ती सामन्यात आघाडीवर होती. पण त्यानंतर ती सामन्यात मागे पडू लागली आपली लीड कायम ठेवता न आल्याने अखेर तिला हा रोमहर्षक सामना 3-2 च्या फरकाने गमवावा लागला. पाच गेम चाललेल्या सामन्यात चीनच्या खेळाडूने 11-9,3-11,15-17,11-7,11-4 च्या फरकाने विजय मिळवला.
इतर बातम्या
Tokyo Paralympics 2020 चे थाटात उद्घाटन, भारताच्या टेक चंदने फडकावला तिरंगा
(indias table tennis player bhavina patel won her second round match at tokyo paralympics)