पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शब्द पाळला, पीव्ही सिंधूला विजयानंतर दिलेलं Promise पूर्ण
भारतीय खेळाडूंनी यंदा ऑलिम्पिक्समध्ये सात पदकं खिशात घातली. ज्यात नीरजच्या चमकदार सुवर्णपदकाचाही समावेश आहे. या कामगिरीनंतर सर्व खेळाडूंचे देशभरातून कौतुक अजूनही थांबलेले नाही.
नवी दिल्ली : भारतीय खेळाडूंनी यंदा ऑलिम्पिक (Tokyo Olympics) खेळामध्ये ऐतिहासिक कामगिरी करत सात पदक मिळवली. भारताच्या महिलांसह पुरुषांनी उत्कृष्ट कामगिरी करत इतिसाह रचला. यात एथलेटिक्समध्ये 100 हून अधिक वर्षानंतर सुवर्णपदक, हॉकीमध्ये 41 वर्षानंतर पदक अशा एक न अनेक ऐतिहासिक कामगिरींचा समावेश आहे. यामुळे भारतीय खेळाडूंचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यांच्यावर बक्षिसांचा पाऊस पडत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देखील भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ऑलिम्पिकमधील सर्व सहभागी खेळाडूंना लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण कार्यक्रमासाठी आमंत्रित करत त्यांचे अभिनंदन केले. खेळाडूंशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. विशेष म्हणजे ऑलिम्पिकपूर्वी त्यांनी पीव्ही सिंधूला (PV Sindhu) सोबत आईस्क्रिम खाण्याचे प्रॉमिसही पूर्ण केले. तर गोल्डन बॉय नीरज चोप्राला (Neeraj Chopra) गोड पदार्थ चुरमा खायला दिला.
Bonding over churma!
PM Shri Narendra Modi and @Neeraj_chopra1 share a lighter moment.#Tokyo2020 pic.twitter.com/DK7HLohKtU
— Mann Ki Baat Updates मन की बात अपडेट्स (@mannkibaat) August 16, 2021
सिंधूला दिलं होत वचन
पंतप्रधानांन नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिकला जाण्यापूर्वी सर्व खेळाडूंशी संवाद साधला होता. यावेळी खेळाडूंच्या घरची परिस्थिती ते त्यांचा ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास अशा अनेक मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या. त्याचवेळी आघाडीची टेनिसपटू पीव्ही सिंधूला ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर आपण सोबत आईस्क्रीम खाऊ असं वचन दिलं होतं. दरम्यान सिंधूने सेमीफायनलमध्ये पराभवानंतरही तिसऱ्या स्थानाचा सामना जिंकत कांस्य पदकावर नाव कोरलं. ज्यानंतर मोदींनी दिलेलं वचन पाळत तिच्यासोबत स्वांतत्र्य दिनादिवशी आईस्क्रिम खाललं.
.@Pvsindhu1 with the promised icecream by PM Shri Narendra Modi! pic.twitter.com/pUzShoDxv2
— Mann Ki Baat Updates मन की बात अपडेट्स (@mannkibaat) August 16, 2021
भारताला एकूण सात पदकं
टोक्योमध्ये भारताला एकूण सात पदकं मिळवण्यात यश आलं. या सात पदकांत भालाफेक खेळात नीरज चोप्राला सुवर्णपदक, वेटलिफ्टर मिराबाई चानू आणि पैलवान रवी दहियाला रौप्य पदक मिळालं. तर बॅडमिंटपटू पीव्ही सिंधू आणि पैलवान बजरंग पूनियासह बॉक्सर लवलीना बोरगोहेनला कांस्य पदक मिळालं. याशिवाय सांघिक खेळात भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्य पदकावर नाव कोरलं.
इतर बातम्या
Tokyo Olympics 2021: उत्कृष्ठ! पीव्ही सिंधूच्या खिशात कांस्य पदक, भारताची आणखी एका पदकाची कमाई
टाटांच्या दिलदारपणाला हॅट्सऑफ, ऑलिम्पिकमध्ये पदक न मिळवणाऱ्या खेळाडूंनाही भारदस्त कार देणार
सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव, कोट्यवधीच्या रोख रकमेसह गाडी आणि बरंच काही
(PM modi ate icecream with PV sindhu and gave churma to Neeraj chopra for winning medal at tokyo Olympics)