Vinod Kambli : … जास्त झाली की तब्येत बिघडली? विनोद कांबळी यांच्या व्हायरल व्हिडिओचे सत्य तरी काय? मित्रांच्या दाव्यांनी नवा वाद…

Indian Cricketer Vinod Kambali : माजी क्रिकेटपटू यांची तब्येत खरंच नाजूक आहे का? सोशल मीडियावरील त्यांच्या व्हिडिओवर अनेकांनी हळहळ व्यक्त केली. त्याच्या मित्रांनी याविषयीचा नवीन दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Vinod Kambli : ... जास्त झाली की तब्येत बिघडली? विनोद कांबळी यांच्या व्हायरल व्हिडिओचे सत्य तरी काय? मित्रांच्या दाव्यांनी नवा वाद...
विनोद कांबळी यांच्या व्हिडिओचे सत्य काय?
Follow us
| Updated on: Aug 10, 2024 | 9:37 AM

क्रिकेट जगातला माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या एका व्हिडिओने मोठा झटका दिला. भारतीय फलंदाज विनोद कांबळी हा चालताना अडखळत होता. त्याला धड चालता येत नसल्याचे दिसत होते. चालण्यासाठी इतरांची मदत घेणारा विनोद कांबळी पाहून त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली होती. त्या सर्वांना मोठा धक्का बसला होता. विनोदच्या तब्यतीबाबत काळजी व्यक्त करण्यात येत होती. पण आता त्याच्या मित्रांनी याविषयीचा नवीन दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे या व्हायरल व्हिडिओचे सत्य?

Viral Video तरी काय?

हे सुद्धा वाचा

विनोद कांबळी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात त्यांना चालताना अडचण येत होती. तीन लोकांच्या मदतीने ते चालताना दिसत होते. या व्हिडिओने क्रिकेट जगतात एकच खळबळ उडून दिली. अनेक जणांना धक्का बसला. त्याच्या चाहत्यांनी सचिन तेंडूलकर पासून ते अनेक दिग्गज क्रिकेटपटूंकडे मदतीचे आवाहन केले.

आता आली मोठी अपडेट

आता विनोद कांबळी यांच्या तब्येतीविषयी महत्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. कांबळी यांच्या मित्रांनी सांगितले की हा व्हिडिओ जुना आहे आणि तो पुन्हा व्हायरल झाला आहे. त्यांची तब्येत ठणठणीत आहे. कांबळी यांचे शाळेतील मित्र रिकी आणि मार्कस कौटो हे भेटण्यासाठी त्याच्या घरी गेले. त्यावेळी कांबळी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. रामेश्वर सिंह यांनी या भेटीचा व्हिडिओ पण सोशल मीडिया X वर शेअर केला.

मी एकदम फिट

या व्हिडिओत विनोद कांबळी यांनी फॅन्सी संवाद साधला. मी एकदम फिट आहे. आजही तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करु शकतो. फिरकीपटूंचे चेंडू आजही मैदानाबाहेर टोलवू शकतो, पाठवू शकतो, असं विनोदने या व्हिडिओत सांगितले. त्याचे क्रिकेटवरील प्रेम आणि त्याचा आत्मविश्वास या व्हिडिओत दिसून आला. या व्हिडिओने त्याच्या चाहत्यांना सूखद धक्का दिला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. चाहत्यांनी व्हिडिओ पाहून आनंद व्यक्त केला आहे. तर काहींनी हा खरंच जुना व्हिडिओ का, मग त्यावेळी काय झाले होते, तो अडखळत का चालत होता. त्याला चालण्यासाठी इतरांची मदत का घ्यावी लागली असा वादाचा सूर आळवला आहे.

तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल.
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.