Virat-Anushka| विरुष्कावरून मुलांची नावं ?, विराट-अनुष्काचं मुलांच्या नावांशी नेमकं कनेक्शन काय?; तुम्हाला माहीत आहे का ?
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई-वडील बनले आहेत. अनु्ष्काने गेल्या आठवड्यात मुलाला जन्म दिला असून अकाय असं त्याचं नाव ठेवण्यात आलं. विराट-अनुष्काने काल सोशल मीडियावरून सर्वांसोबत ही माहिती शेअर केल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. विराट आणि अनुष्काचं त्यांच्या दोन्ही मुलांच्या नावाशी एक खास कनेक्शन आहे.

Anushka Sharma Became Mother : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय स्टार क्रिकेटर विराट कोहली हे दुसऱ्यांदा आई-बाबा बनले आहेत.अनु्ष्काने गेल्या आठवड्यात मुलाला जन्म दिला असून त्याचं नाव ‘अकाय’ असं ठेवण्यात आलं आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून अनुष्काच्या प्रेग्नन्सीबद्दल चर्चा सुरू होती, मात्र विराट-अनुष्काने त्याबद्दल मौन राखलं होतं. विराटचा जवळचा मित्र एबी डिव्हिलियर्सनेही काही दिवसांपूर्वी याबाबतचे संकेत दिले होते पण नंतर त्याने त्याचं वक्तव्य मागे घेतलं. विराट कोहलीने सध्या इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतून माघार घेतल्यानंतर तर याबद्दलच्या चर्चांना अजूनच उधाण आलं.
अखेर काल, (१९ फेब्रुवारी) संध्याकाळी, विराट-अनुष्काने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून मुलाच्या जन्माची गुड न्यूज सर्वांसोबत शेअर केली. 15 फेब्रुवारी रोजी अनुष्काने दुसऱ्या बाळाला जन्म दिला असून त्याचे नाव अकाय असल्याचेही पोस्टमधून शेअर करण्यात आले. पण विरुष्का (विराट-अनुष्काच्या एकत्र नावाचा शॉर्टफॉर्म) यांचं त्यांच्या दोन्ही मुलांच्या नावाशी एक खास कनेक्शनदेखील आहे. तुम्हाला त्याबद्दल माहीत आहे का ?
काय आहे खास कनेक्शन ?
क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघानी बराच काळ डेटिंग केल्यानंतर डिसेंबर 2017 मध्ये लग्न केलं. त्यानंतर जानेवारी 2021 मध्ये त्यांना पहिली मुलगी झाली. त्यांनी तिचं नाव वामिका असं ठेवलं. तर वामिकाच्या जन्मानतर तीन वर्षांनी विराट-अनुष्का दुसऱ्यांदा आई-वडील बनले असून त्यांना मुलगा झाला. अकाय असं त्यांनी मुलाचं नाव ठेवलं. कनेक्शनबद्दल बोलायचं झालं तर विराट कोहलीचं नाव V वरून सुरू होतं आणि वामिकाचं नावंही V वरूनच आहे. असंच , त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या नावाबाबतही आहे. अनुष्काचं नाव A वरून सुरू होतं आणइ त्यांनी मुलाचं नावंही A वरून अकाय असं ठेवलं आहे.
सोशल मीडियावरून शेअर केली होती बातमी
View this post on Instagram
विराट-अनुष्काने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून मुलाच्या जन्माची गुड न्यूज जगासोबत शेअर केली होती. ‘ आम्हाला सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की, आमच्या घरी 15 फेब्रुवारीला एका गोंडस बाळाने जन्म घेतला आहे. बाळाचं नाव अकाय ठेवलं असून वामिका हिला छोटा भाऊ मिळाला आहे. तुमचा आशीर्वाद आमच्या पाठिशी कायम राहू दे. आमची तुम्हाला विनंती आहे की प्रायव्हसीचा मान राखावा’ , असं विराट कोहली आणि अनुष्काने त्यांच्या पोस्टमध्ये लिहीलं होतं. विराट-अनुष्काने ही गुड न्यूज शेअर करताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. बॉलिवूड आणि क्रीडा जगतातील दिग्गजांनीही विराट कोहली आणि अनुष्काचं अभिनंदन केलं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही त्या दोघांना शुभेच्छा दिल्या.
