Virat Anushka | विराटही विचारतो ‘जेवलीस का?’, मैदानातून अनुष्काला खाणाखुणा

मैदानातूनच अनुष्काला खाणाखुणांतून 'जेवलीस का?' असं विचारतानाचा विराटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Virat Anushka | विराटही विचारतो 'जेवलीस का?', मैदानातून अनुष्काला खाणाखुणा
Follow us
| Updated on: Oct 29, 2020 | 11:48 AM

दुबई : आयपीएलच्या (IPL 2020) निमित्ताने ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु’चा (Royal Challengers Bangalore) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) दुबईत आहे. विराटच्या नेतृत्वात संघाने मैदानात दमदार कामगिरी केली असली, तरी घरच्या मैदानातही कोहली आघाडीवर आहे. दुबईत दौऱ्यावर सोबत असलेली गरोदर पत्नी अर्थात अभिनेत्री अनुष्का (Anushka Sharma) शर्माची काळजी घेण्यात तो मागे नाही. मैदानातूनच अनुष्काला खाणाखुणांतून ‘जेवलीस का?’ असं विचारतानाचा विराट-अनुष्काचा व्हिडीओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. (Virat Kohli asks Anushka Sharma from the field if she has eaten Video goes viral)

गेल्या रविवारी चेन्नई सुपरकिंग्जसोबत झालेल्या सामन्याच्या वेळचा हा व्हिडीओ असल्याची माहिती आहे. विराटच्या ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु’ संघाला चिअर करण्यासाठी अनुष्का स्टँडमध्ये आल्याचं दिसतं. यावेळी तिने लाल रंगाचा गाऊन घातला होता. स्टेडिअममधूनच विराट हाताने खूण करत ‘काही खाल्लंस का?’ अशा अर्थाचा प्रश्न विचारतो. त्यावर अनुष्काही दोन्ही हातांनी ‘थंब्ज अप’ दाखवत होकार दर्शवते. त्यानंतर विराट खळाळून हसतो आणि दोघांमध्ये हातवाऱ्यांनी वार्तालाप सुरुच राहतो. दोघांच्या या गोड व्हिडीओवर नेटिझन्सनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावरुन अनुष्काच्या प्रेग्नन्सीबद्दल सर्वांना माहिती दिली होती. तसेच जानेवारी 2021 मध्ये बाळाचा जन्म होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अनुष्काचे अनेक फोटो सध्या व्हायरल होत आहेत असून त्यात तिचे बेबी बम्पही दिसते.

View this post on Instagram
(Virat Kohli asks Anushka Sharma from the field if she has eaten Video goes viral)

Couple Goals ? Follow ❤️ ?@music__and__masthi ? ❤️ #Followusformore . . . ?️ For more videos of ? ?️ #TollyWood #BollyWood #VideoSongs #Musically #Dance #DanceVideos ?️?❤️ @instatrendsoffl #deepthishannu#combination #love #shekarmaster #naveenkumarreddy1#viral#tiktok#telugulovesongs#telugulovefailurewhatsappstatus#telugulovers #telugulovesongs #telugudubssmash #viratkohli #virushka #anushkasharma #iccworldcup2019 DISCLAIMER ‌This photo, video or Audio is not owned by ourselves ‌The copyright credit goes to respective owners ‌This video is not used for illegal sharing or profit Making ‌This video is purely Fan made ‌If any problem Message us on Instagram and the video will be removed ‌No need to report or send strike ‌Credit/Removal:-@music__and__masthi

A post shared by MUSIC & MASTHI (@music__and__masthi) on

अनुष्काचे मोठ्या पडद्यावरील अखेरचे दर्शन शाहरुख खान आणि कतरिना कैफसोबत 2018 च्या ‘झिरो’ चित्रपटात झाले होते. तिने अलिकडेच ‘पाताल लोक’ आणि बुलबुल सारख्या वेब सिरीजची निर्मिती केली आहे.

संबंधित बातम्या :

कॉमेंट्रीत विराट-अनुष्काविषयी आक्षेपार्ह टिप्पणी, सुनील गावस्करांवर चाहते बरसले

कुणीतरी येणार येणार गं!! अनुष्का-विराटकडे ‘गुड न्यूज’

(Virat Kohli asks Anushka Sharma from the field if she has eaten Video goes viral)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.