सोशल मीडियावर एका पोस्टसाठी विराट घेतो 14 कोटी, आलिया, कटरीना, दीपिका किती घेतात…
Cricket World Cup 2023 | क्रिकेट आणि बॉलीवूडमधील सेलिब्रिटी जाहिरातींच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई करत असतात. सोशल मीडियातून त्यांची चांगलीच कमाई होत आहे. विराट कोहली सोशल मीडियातील एका पोस्टसाठी 14 कोटी रुपये घेतो. तसेच आलिया, कटरीना, दीपिका किती घेतात...
मुंबई | 17 नोव्हेंबर 2023 : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत एकदिवशीय सामन्यात 50 शतकांचा विक्रम विराट कोहली याने केला आहे. सचिन तेंडुलकर याच्या नावावर यापूर्वी एकदिवशीय सामन्यात सर्वाधिक शतकांचा विक्रम होता. क्रिकेटमध्ये नवीन नवीन विक्रम करणारा विराट सोशल मीडियावर विक्रमावर विक्रम करत आहेत. इंस्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणारा तो सेलिब्रिटी ठरला आहे. इंस्टाग्रामवर विराट कोहली याचे तब्बल 258 दक्षलक्षपेक्षा जास्त फॉलोवर आहेत. विराट कोहलीप्रमाणे कटरीना कैफ, आलिया भट्ट, दीपिका पादुकोण यांचे फॉलोवर्स मोठ्या संख्येने आहेत. हे सिलिब्रिटी कोट्यवधी रुपये एका पोस्टसाठी घेतात. जाहिरतीप्रमाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून सेलिब्रिटींज कोट्यवधी रुपयांची कामाई करत आहे.
विराट घेतो 14 कोटी रुपये, कॅटरीना किती घेते
इंस्टाग्रामवर विराट कोहली याचे 258 दलक्षपेक्षा फॉलोअर्स आहेत. एका रिपोर्ट्सनुसार विराट कोहली इंस्टाग्रॉमवर चांगलाच सक्रीय आहे. एक पोस्टासाठी 14 कोटी रुपये विराट कोहली घेतो. सर्व सेलिब्रिटीमध्ये विराट कोहली सर्वाधिक शुल्क घेतो. बॉलिवूड स्टार कटरीना कैफ हिचे इंस्टाग्रामवर 76 दक्षलक्ष फॉलोअर्स आहेत. कॅटरीना विराट कोहलीपेक्षा खूपच कमी फी घेते. एका पोस्टासाठी कॅटरिना एक कोटी रुपये घेत असल्याचे म्हटले जाते. कॅटरीनापेक्षा बॉलीवूडमधील इतर कलाकार जास्त फी घेत आहे. त्यात आलिया आणि दीपिका हिचाही संबंध आहे.
आलिया भट्ट आणि दीपिका पादुकोण
Instagram वर आलिया भट्ट हिचे 79.4 दक्षलक्ष फॉलोअर्स आहेत. आलिया कॅटरीना पेक्षा जास्त शुल्क घेत असल्याचे म्हटले जाते. एका पोस्टसाठी आलिया भट्ट 1.5 ते 2 कोटी रुपये घेत आहे. दीपिका पादुकोण हिचे इंस्टग्रामवर 75.7 दक्षलक्ष फॉलोअर्स आहेत. दीपिका इंस्टाग्रामवरील एक पोस्टसाठी 2 कोटी रुपये घेत आहे.
अक्षय कुमार घेतो दोन ते तीन कोटी
बॉलीवूडमधील ‘खिलाडी’ अक्षय कुमार इंस्टाग्रामवर चांगलाच लोकप्रिय आहे. त्याचे 65.8 दक्षलक्ष फॉलोअर्स आहेत. अक्षय कुमार एका पोस्टसाठी 2-3 कोटी रुपये घेतो. तसेच प्रियंका चोपडा एका पोस्टसाठी दोन कोटी रुपये घेत असल्याचे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे. प्रियंकाचे इंस्टाग्रामवर 89.2 दक्षलक्ष फॉलोअर्स आहेत.