India vs Australia 2020 3rd T20 : विराट कोहलीने रचला इतिहास, हा जबरदस्त रेकॉर्ड करणारा दुसरा भारतीय बॅट्समन

विराट कोहलीने टी-20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खास विक्रम आपल्या नावावर केला.

India vs Australia 2020 3rd T20 : विराट कोहलीने रचला इतिहास, हा जबरदस्त रेकॉर्ड करणारा दुसरा भारतीय बॅट्समन
Follow us
| Updated on: Dec 08, 2020 | 6:31 PM

सिडनी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus) यांच्यात पार पडलेल्या अखेरच्या आणि तिसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat kohli) शानदार अर्धशतक झळकावलं. इंटरनॅशनल टी-ट्वेन्टी क्रिकेटमधलं विराट कोहलीचं हे 25 वं अर्धशतक ठरलं. याबरोबरच विराट कोहलीने टी-20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपल्या नावावर खास विक्रम केला. टी-20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक करण्याऱ्या रोहित शर्माच्या विक्रमाशी विराट कोहलीने बरोबरी केली आहे. (Virat Kohli equals Rohit Sharma record for most half-centuries in T20 cricket)

भारताचा धडाकेबाज बॅट्समन रोहित शर्माने (Rohit Sharma) टी-ट्वेन्टी क्रिकेट करिअरमध्ये आतापर्यंत 25 वेळा अर्धशतकं झळकावली आहेत. आज विराट कोहलीने तिसऱ्या आणि अखेरच्या टी-ट्वेन्टी मॅचमध्ये झुंजार फलंदाजीचं दर्शन घडवत 85 धावा ठोकल्या. भारताकडून सर्वाधिक अर्धशतक झळकावणाऱ्या बॅट्समनच्या यादीत रोहितनंतर आता विराटचं नाव घेतलं जाईल. किंबहुना आजच्या अर्धशतकाने विराटने रोहितच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner) टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये अर्धशतकं झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. वॉर्नरने आपल्या टी-20 इंटरनॅशनल क्रिकेट करिअरमध्ये आतापर्यंत 19 अर्धशतकं झळकावली आहे.

याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताकडून सर्वाधिक रन्स करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक रन्स करणाऱ्या फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) पहिल्या क्रमांकावर आहे. विराटने आतापर्यंतच्या कारकीर्दीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3000 धावा ठोकल्या आहेत. विराट कोहलीचे 2020 या वर्षात टी-ट्वेन्टीत आजचं पहिलंच अर्धशतक ठरलं.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स सचिन तेंडुलकरने केले आहेत. तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3300 धावा केल्या आहेत. रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1788 रन्स केले आहेत. तर याशिवाय व्हीव्हीएस लक्ष्मनने (VVS Laxman) 1703 रन्स तर राहुल द्रविडने (Rahul Dravid) 1688 रन्स केले आहेत.

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन सामन्यांची  टी 20 मालिका 2-1 अशी जिंकली. या मालिका विजयासह कर्णधार विराटने ऐतिहासिक कामगिरी केली. विराट ऑस्ट्रेलियाविरोधात तीनही फॉर्मेटमध्ये सीरिज जिंकवून देणारा एकमेव भारतीय कर्णधार ठरला आहे. तर एकूण दुसरा कर्णधार ठरला आहे. याआधी अशी कामगिरी दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फॅफ डु प्लेसीसने केली होती.

(Virat Kohli equals Rohit Sharma record for most half-centuries in T20 cricket)

संबंधित बातम्या

India vs Australia 2020 3rd T20 Live Updates : अखेरचा टी-ट्वेन्टी सामना जिंकत ऑस्ट्रेलियाचा शेवट गोड, भारताचा 12 रन्सने पराभव

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.