India Tour Australia | विराट कोहलीमुळे अॅडलेड कसोटीसाठी तिकीटांची मागणी वाढली
भारतीय संघाला कर्णधार विराट कोहलीमुळे अॅडलेड कसोटीसाठी तिकीटांची मागणी वाढली असल्याचं चित्र आहे.
अॅडलेड : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (India Tour Australia) सिडनीमध्ये पोहचली आहे. अवघ्या काही दिवसांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यानंतर टीम इंडिया अनुक्रमे टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना अॅडलेडच्या ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाला कर्णधार विराट कोहलीमुळे अॅडलेड कसोटीसाठी तिकीटांची मागणी वाढली असल्याचं चित्र आहे. (Virat kohli IND VS Australia test match ticket Adelaide)
अॅडलेडमध्ये होणारी पहिली टेस्ट मॅच डे नाईट फॉरमॅटमध्ये असणार आहे. ही एकमेव टेस्टमॅच असेल ज्यामध्ये विराट कोहली खेळणार आहे. पहिल्या टेस्ट मॅचनंतर विराट मायदेशी परतणार आहे. जानेवारी महिन्यात विराट बाबा होणार आहे. त्यासाठी बीसीसीआयने त्याची खास पालकत्व रजा मंजूर केली आहे. त्यामुळे पहिल्या मॅचमध्ये विराटला खेळताना पाहणे चाहत्यांसाठी पर्वणी असणार आहे. याचमुळे तिकीटांची मागणी वाढल्याची चर्चा आहे.
अॅडलेडमध्ये होणाऱ्या पहिल्या कसोटीची खूपच चर्चा आहे. या मॅचसंबंधी विविध आडाखे बांधायला सुरुवात झाली आहे. तसंच प्रेक्षकांमध्ये या मॅचची उत्सुकता देखील कमालीची आहे, असं तिकीट विक्रेते मलिक अंगद सिंह ओबेरॉय यांनी सांगितलं. दुसरीकडे अॅडलेडमधली कसोटी डे नाईट फॉरमॅटमध्य होणार असल्याने देखील प्रेक्षक चांगलेच खूश आहेत. यामुळेही तिकीट विक्री वाढली असल्याचं निरीक्षकांचं म्हणणं आहे.
विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) गर्भवती आहे. पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्यात अनुष्का शर्मा आणि विराट आई बाबा होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर विराटने बीसीसीआयकडे पॅटनिर्टी लिव्हसाठी अर्ज केला होता. बीसीसीआयने विराटची रजा मंजूर केली आहे. त्यामुळे विराट टीम इंडियासाठी तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत खेळताना दिसणार नाही.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत एकूण 4 सामने खेळण्यात येणार आहेत. या मालिकेतील दुसरा, तिसरा आणि चौथा सामना अनुक्रमे 26 डिसेंबर, 7 आणि 15 जानेवारी 2020 ला खेळण्यात येणार आहे. विराटच्या घरी या कालावधी दरम्यान नवीन पाहुणा येणार असल्याने विराटने शेवटच्या 3 कसोटीतून माघार घेतली आहे. (Virat kohli IND VS Australia test match ticket Adelaide)
टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा
एकदिवसीय (वनडे) मालिका
पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल
टी-20 मालिका
पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी
कसोटी (टेस्ट) मालिका
पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन
संबंधित बातम्या :
IND vs AUS : के एल राहुलचं प्रमोशन, टीम इंडियाच्या उपकर्णधारपदाची धुरा