Icc Test Ranking : विराटची दादागिरी कायम, पुजाराची घसरण, आश्विनने कमावलं बुमराहने गमावलं
आयसीसीने नुकतीच टेस्ट क्रमवारी जाहीर केली आहे.
दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (International Cricket Council) अर्थात आयसीसीने टेस्ट रॅंकिग जाहीर केली आहे. टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरोधात पहिल्या कसोटीत पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाचा परिणाम या टेस्ट रँकिंगवर झाला आहे. यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहची 11 व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. तर टीम इंडियाचा टेस्ट स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजाराची एका क्रमांकाने घसरण झाली आहे. तर दुसऱ्या ठिकाणी मात्र फिरकीपटू रवीचंद्रन आश्विनला एका क्रमांकाचा फायदा झाला आहे. तर विराट कोहलीने दुसरा क्रमांक कायम राखला आहे. Virat kohli retains position in ICC Test rankings while Jaspreet Bumrah 11 position drops
टीम इंडियाला पहिल्या कसोटीत लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फलंदाज चेतेश्वर पुजाराला आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.
पुजाराची घसरण
तर फलंदाजांच्या यादीत पुजाराला एका क्रमांकाचं नुकसान झालं आहे. पुजाराची सातव्या क्रमांकावरुन आठव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. पुजाराकडे एकूण 755 पॉइंट्स आहेत.
विराटचं स्थान कायम
विराटला आपलं दुसरं स्थान कायम राखण्यास यश आलं आहे. विराटने ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात 74 धावांची खेळी केली. विराटकडे एकूण 888 इतके पॉइंट्स आहेत. फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने पहिला क्रमांक कायम राखला आहे. स्मिथच्या नावावर 901 पॉइंट्स आहेत.
Virat Kohli gains two points to reduce the gap between him and Steve Smith in the latest @MRFWorldwide ICC Test Player Rankings for batting ?
Full list ? https://t.co/OMjjVwOboH pic.twitter.com/LbUovKuEf6
— ICC (@ICC) December 20, 2020
बुमराहने गमावलं, आश्विनने कमावलं
बुमराहला पहिल्या कसोटीत फार चांगली करता आली नाही. यामुळे गोलंदाजाच्या यादीत बुमराहला 2 स्थानांचं नुकसान झालं आहे. बुमराहची 13 व्या क्रमांकावरुन 11 व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार बुमराहच्या नावावर 713 रेटिंग्स पॉइंट्स आहेत.
? Josh Hazlewood storms into top 5️⃣ ? R Ashwin climbs up one spot to No.9️⃣
Check out the latest @MRFWorldwide ICC Test Player Rankings for bowling ? https://t.co/OMjjVwOboH pic.twitter.com/aoIIhBUiPH
— ICC (@ICC) December 20, 2020
तर आश्विनने पहिल्या डावात 4 तर दुसऱ्या डावात 1 असे एकूण 5 विकेट्स घेतल्या. यामुळे आश्विनने दहाव्या क्रमांकावरुन नवव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. आश्विनकडे एकूण 777 इतके पॉइंट्स आहेत. दरम्यान दुसरा कसोटी सामना हा 26 डिसेंबरपासून खेळण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या :
Australia vs India, 1st Test | कसोटी इतिहासात टीम इंडियाच्या नावावर लाजीरवाणा विक्रम
Australia vs India 1st Test | टीम इंडियाच्या पराभवाचे टॉप 3 व्हिलन
Virat kohli retains position in ICC Test rankings while Jaspreet Bumrah 11 position drops