Ind Vs Eng : इंग्लंडविरुद्ध मैदान मारण्यासाठी विराट कोहली सज्ज, हॉटेलच्या रुममधून मॅचच्या तयारीचा खास व्हिडीओ !

कर्णधार विराट कोहली याने एक व्हिडीओ ट्विट करत आपण हॉटेलमध्येच मॅचसाठीच्या तंदुरुस्तीची तयारी करत असल्याचं सांगितलं आहे. | Virat Kohli Exercise

Ind Vs Eng : इंग्लंडविरुद्ध मैदान मारण्यासाठी विराट कोहली सज्ज, हॉटेलच्या रुममधून मॅचच्या तयारीचा खास व्हिडीओ !
Virat Kohli Exercise
Follow us
| Updated on: Jan 30, 2021 | 8:52 AM

चेन्नई : इंग्लंडचा संघ (England Team) टीम इंडियाविरुद्धच्या (Team India) मालिकेसाठी भारतात पोहोचला आहे. भारतातल्या आगमनाचा व्हिडिओ इंग्लंड टीमच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे. भारतीय संघही चेन्नईच पोहोचला आहे. अशातच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने एक व्हिडीओ ट्विट करत आपण हॉटेलमध्येच मॅचसाठीच्या तंदुरुस्तीची तयारी करत असल्याचं सांगितलं आहे. (Virat Kohli Start preparation For England test match Series)

गुरुवारी भारतीय क्रिकेटपटूंसाठी कोरोना आरटी पीसीआरची पहिली चाचणी घेण्यात आली असून सर्व खेळाडूंची पहिली चाचणी निगेटीव्ह झाली आहे. 2 फेब्रुवारीपासून सराव सुरु करण्यापूर्वी खेळाडूंच्या आणखी दोन चाचण्या होणार आहेत. ही मालिका 5फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि दोन्ही कसोटी सामने चेन्नई येथे खेळले जातील.

भारतीय संघ याआधीच चेन्नईला पोहोचला आहे आणि खेळाडूंना लीला हॉटेल पॅलेसमधील खोल्यांमध्ये क्वारन्टाईन करण्यात आलं आहे. सराव करण्यासाठी तसंच स्वत: ला पूर्णपणे फिट करण्यासाठी सर्व खेळाडू आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. भारतीय कर्णधार विराट कोहलीने हॉटेलच्या खोलीत व्यायामाचा एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यामध्ये तो सायकल चालवताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत कोहलीने संदेश दिला की हॉटेलच्या खोलीत राहूनही तो किती आपल्या वेळेचा किती सदुपयोग करतो. पोस्टमध्ये विराटने लिहिले आहे की, “क्वारन्टाईनच्या दिवसांत आपल्याला संगीत आणि जिमची आवश्यकता असते. जर तुम्हाला खरोखर कठोर परिश्रम करायचे असतील तर ते कुठेही केले जाऊ शकते. प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येक दिवस खास असतो…”

बीसीसीआयने खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांना सोबत ठेवण्याची परवानगी दिली आहे. क्वारन्टाईन पिरीयडमध्ये असताना त्यांना एकाकीपणा, एकटेपणा वाटू नये, यासाठी बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. उपकर्णधार अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, यष्टिरक्षक वृद्धिमान साहा आणि हार्दिक पांड्या कुटुंबीयांसह चेन्नईत दाखल झाले आहेत.

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरोधात (Team India) तर इंग्लंडने श्रीलंकेविरोधात (England vs Sri Lanka) त्यांच्याच भूमित कसोटी मालिकेत शानदार विजय मिळवला. यामुळे इंग्लंड आणि टीम इंडियाचा विश्वास दुणावला आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.

(Virat Kohli Start preparation For England test match SeriesVirat Kohli Start preparation For England test match Series)

हे ही वाचा :

IND vs ENG : पाहुणे आले…. कसोटी मालिकेसाठी इंग्लंडच्या संघाचं भारतात आगमन

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.