सगळ्यांची बुद्धी गुडघ्यात.. जाटांबद्दल वीरेंद्र सेहवागच्या नव्या विधानाने गदारोळ, VIDEO व्हायरल
स्टार स्पोर्ट्सच्या आयपीएलशी संबंधित शोमध्ये वीरेंद्र सेहवागने जाटांबद्दल एक विचित्र विधान केले आहे, त्यानंतर सोशल मीडियावर मोठा गदारोळ माजला आहे. त्याने माफी मागावी अशी मागणीही सुरू झाली आहे.

भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग हा पुन्हा एकदा त्याच्या विचित्र विधानामुळे चर्चेत आला आहे. यावेळी त्याने जाट समुदायाबाबत एक स्फोटक विधान केलं असून त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. सेहवागच्या या विधानानंतर त्याच्याकडून माफी मागण्याची मागणी होत आहे. माजी भारतीय सलामीवीर असलेला वीरेंद्र सेहवाग सध्या आयपीएल सामन्यांदरम्यान हिंदीमध्ये समालोचन करत आहे. स्टार स्पोर्ट्सच्या आयपीएलशी संबंधित शोमध्ये त्याने जाटांबद्दल हे विधान केले. सेहवागच्या म्हणण्यानुसार, भारतातील प्रत्येक प्रदेशातील जाटांची भाषा वेगळी आहे पण त्यांची सर्वांची बुद्धी गुडघ्यातंच आहे, त्याच्या या विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे.
‘दिमाग से सारे पैदल’, सेहवागचं विचित्र विधान
स्टार स्पोर्ट्सच्या शोमध्ये सहभागी झालेला सेहवाग म्हणाला की, उत्तर प्रदेशातील जाटांची भाषा वेगळी आहे, राजस्थानातील जाटांची भाषा वेगळी आहे. हरियाणातील जाटांची भाषा वेगळी आहे… पण ते सर्व मंदच आहेत. दिहुमाग से सारे पैदल है.. असं त्याचं वाक्य होतं.
सगळ्यांची बुद्धी गुडघ्यात.. वीरेंद्र सेहवागच्या नव्या विधानाने गदारोळ, VIDEO व्हायरल
सगळ्यांची बुद्धी गुडघ्यात.. जाटांबद्दल वीरेंद्र सेहवागच्या नव्या विधानाने गदारोळ, VIDEO व्हायरल
#VirenderSehwagh
सेहवागने माफी मागावी, मागणीला जोर
भारताचा माजी सलामीवीर असलेल्या सेहवागच्या या विधानानंतर सोशल मीडियावर युजर्सनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला असून त्याने माफी मागावी अशी मागणी करण्यात येत आहे. सहवागला माफी मागायला लावावी अशी मागणी युजर्सनी रणदीप हुड्डाकडे केली आहे. वीरेंद्र सेहवाग स्वतः जाट समुदायाचा आहे. मात्र असे असूनही, त्याने या शोमध्ये असे विचित्र विधान केल्याने सगळ्यांनाचा धक्का बसला आहे.
@RandeepHooda माफ़ी मंगवाओ अब।
— Tauseef Ahmad (@tauseef_ind) April 8, 2025
सेहवागचं करिअर
वीरेंद्र सेहवागच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने भारतासाठी 350 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 17 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. सेहवागने आयपीएलमध्ये 104 सामने खेळले आहेत. तो पंजाब आणि दिल्लीसाठी आयपीएल खेळला आणि एकूण 2728 धावा केल्या. या काळात सेहवागने 2 शतके आणि 16 अर्धशतकेही झळकावली. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर वीरेंद्र सेहवागने कॉमेंट्री करण्यास सुरूवात केली.
