Wasim Akram : ‘इतकी केळी तर…’, पाकिस्तान टीमबद्दल वसिम अक्रम यांचं वादग्रस्त वक्तव्य
Wasim Akram : चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सुमार कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट टीमवर चहूबाजूंनी टीका सुरु आहे. माजी क्रिकेटपटू वसिम अक्रम इतके भडकलेत की, त्यांनी टीमवर वांशिक टिप्पणी केली. अक्रम काय बोलून गेले ते जाणून घ्या.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमान असल्यामुळे पाकिस्तानी टीम दमदार कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. पण ही अपेक्षा फोल ठरली आहे. टुर्नामेंटला सुरुवात झाल्यानंतर आठवड्याभराच्या आतच पाकिस्तानच्या क्रिकेट टीमला गाशा गुंडाळावा लागला आहे. त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. पाकिस्तान टीमच्या या खराब प्रदर्शनानंतर त्या देशातील क्रिकेट प्रेमींमध्ये प्रचंड राग आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रमने तर आपल्याच टीमबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. पाकिस्तान क्रिकेट टीमवर त्याने वांशिक टिप्पणी केली. एका शो मध्ये वसिम अक्रमने पाकिस्तानी खेळाडूंची तुलना माकडाबरोबर केली. वसिम अक्रमसारखा खेळाडू ऑनएअर हे जे शब्द बोलला, त्यातून पाकिस्तान टीमबद्दल किती राग भरला आहे, ते दिसून येतं.
पाकिस्तान टीमचा ग्रुप स्टेजमधील आता एक सामना बाकी आहे. 27 फेब्रुवारीला पाकिस्तान आणि बांग्लादेशध्ये सामना होणार आहे. ही मॅच फक्त औपचारिकता मात्र आहे. कारण दोन्ही टीम्स स्पर्धेतून आधीच बाहेर गेल्या आहेत. वसिम अक्रम पाकिस्तानी खेळाडूंवर वांशिक टिप्पणी करताना बरच काही बोलला. भारत-पाकिस्तान सामन्यातील एका प्रसंगाच उदहारण देताना पाकिस्तानी खेळाडूंची त्याने माकडाबरोबर तुलना केली.
‘….तर तिथेच माझी शाळा घेतली असती’
वसिम अक्रम बोलला की, “पहिला की दुसरा ड्रिंक्स ब्रेक होता. त्यावेळी केळ्यांनी भरलेली एक मोठी परात मैदानावर आली. इतकी केळी तर माकडं सुद्धा खात नाहीत, जितके हे खातायत” वसिम अक्रमसोबत या कार्यक्रमात वकास युनूसशिवाय दोन भारतीय क्रिकेटर्स अजय जडेजा आणि निखिल चोप्रा सुद्धा उपस्थित होते. अक्रम बोलला की, “मी जेव्हा खेळायचो तेव्हा इतकी केळी खाताना मला इम्रान खान यांनी पाहिलं असतं, तर तिथेच माझी शाळा घेतली असती”
View this post on Instagram
ग्रुप स्टेजमधूनच OUT
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानच खराब प्रदर्शन आणि भारताकडून झालेला पराभव हे वसिम अक्रम भडकण्यामागच मुख्य कारण आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या ग्रुप स्टेजमधूनच पाकिस्तानची टीम बाहेर गेली आहे. त्यांच्याकडून विजेतेपदाची अपेक्षा बाळगण्यात आलेली. पाकिस्तानला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने 60 रन्सनी हरवलं. दुसऱ्या सामन्यात भारताने 6 विकेटने हरवलं.