Ind VS Aus | आयपीएलमध्ये फ्लॉप, टीम इंडियाविरुद्ध टॉप; मॅक्सवेलच्या वादळानंतर पंजाबच्या कोचकडून मजेशीर मिम्स

पंजाबचा कोच वसीम जाफरने मॅक्सवेलला जोरदार चिमटा घेतला आहे. मॅक्सवेलच्या दोन धमाकेदार इनिंगनंतर 'गुन्हा है ये' असं मजेशीर मिम्स त्याने शेअर केलं आहे.

Ind VS Aus | आयपीएलमध्ये फ्लॉप, टीम इंडियाविरुद्ध टॉप; मॅक्सवेलच्या वादळानंतर पंजाबच्या कोचकडून मजेशीर मिम्स
Follow us
| Updated on: Nov 30, 2020 | 10:26 PM

सिडनीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Ind VS Aus 2020) यांच्यातील दोन्ही एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने आतषी खेळी करत ऑस्ट्रेलियाला धावांचा डोंगर उभा करुन देण्यात मोलाची भूमिका बजावली. मात्र हाच मॅक्सवेल आयपीएलमध्ये सपशेल अपयशी ठरला. त्याला आयपीएलच्या 13 व्या मोसमात पंजाबकडून खेळताना एकही अर्धशतक लगावता आलं नाही. याच पार्श्वभूमीवर पंजाबचा कोच वसीम जाफरने मॅक्सवेलला जोरदार चिमटा घेतला आहे. मॅक्सवेलच्या दोन धमाकेदार इनिंगनंतर ‘गुन्हा है ये’ असं मजेशीर मिम्स त्याने शेअर केलं आहे. (Wasim jaffer Taunt Aus Glenn maxwell)

भारताविरुद्ध पहिल्या वनडे मॅचमध्ये त्याने 19 चेंडूत 45 धावांची खेळी केली तर दुसऱ्या वनडे मध्ये त्याने 29 चेंडूत 63 रन्सची खेळी केली. या दोन्ही मॅचमध्ये मॅक्सवेल भारताच्या बोलर्सवर तुटून पडला. सुरुवातीपासूनच आक्रमक होत त्याने भारताच्या बोलर्सची पिसे काढली. आयपीएलमधला हा तोच मॅक्सवेल आहे का? असा प्रश्न काही क्रिकेटप्रेमींच्या मनामध्ये उपस्थित झाला.

मॅक्सवेलच्या दोन्ही धमाकेदार इनिंगनंतर वसीम जाफरने एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये अभिनेते नसरुद्दीन शहा यांचा फोटो आणि ‘गुन्हा है ये’ असं कॅप्शन आहे. मजेदार मिम्स शेअर करत जाफरने मॅक्सवेलला चिमटा काढला. त्यानंतर हे ट्विट चांगलंच व्हायरल होतंय.

13 व्या मोसमात मॅक्सवेलला लौकीकाला साजेशी खेळी करता आली नाही. मॅक्सवेल आयपीएलमध्ये पंजाबकडून खेळतो तर केएल राहुल या संघाचा कर्णधार आहे. मॅक्सवेलने केलेली तडाखेदार फलंदाजी भारतीय क्रिकेट समर्थकांना पचनी पडली नाही. त्यामुळे भारताविरुद्धच्या दोन्ही धमाकेदार इनिंगनंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी मॅक्सवेलचे पाय ओढलेत.

मॅक्सवेलची आयपीएलच्या 13 व्या पर्वातील कामगिरी

मॅक्सवेल आयपीएलच्या 13 व्या मोसमातील एकूण 13 सामने खेळला. या 13 सामन्यात त्याने 15. 42 च्या सामन्य सरासरीने 108 धावा केल्या. 32 ही त्याची या मोसमातील सर्वोच्च धावासंख्या ठरली.

संबंधित बातम्या

India vs Australia 2020 | आयपीएलमध्ये फ्लॉप, टीम इंडियाविरुद्ध हिट, ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ अष्टपैलू खेळाडूने केएल राहुलची मागितली माफी

IPL 2020, KXIP vs DC | किंमत 10.75 कोटी, 10 सामन्यात केवळ 90 धावा, तरीही कर्णधाराकडून कौतुक

India vs Australia 2020 | कांगारुनी धू धू धुतला, फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या नावे नकोसा विक्रम

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.