छातीत दुखत असल्याने ब्रायन लारा मुंबईतील रुग्णालयात दाखल
जागतिक क्रिकेट जगतात वाघ म्हणून ओळखला जाणारा वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लाराच्या छातीत दुखत असल्या कारणाने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई : जागतिक क्रिकेट जगतात वाघ म्हणून ओळखला जाणारा वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लाराच्या छातीत दुखत असल्या कारणाने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान सध्या त्याच्यावर ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरु आहे.
सध्या विश्वचषकाच्या निमित्ताने ब्रायन लारा भारतात आला आहे. मात्र लाराला सकाळी अचानक छातीत दुखू लागले. त्यामुळे तात्काळ लाराला रुग्णालयात हलवण्यात आले. याआधी लाराला हृदय विकाराचा एक सौम्य झटका आला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून त्याला लगेचच मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान तो लवकर बरा व्हावा यासाठी जगभरातील चाहते प्रार्थना करत आहे.
#Mumbai: West Indies legend Brian Lara has been admitted to Global Hospital in Parel after he complained of chest pain. Hospital to issue a statement shortly. (file pic) pic.twitter.com/sGnvBpiavA
— ANI (@ANI) June 25, 2019
दरम्यान सध्या विश्वचषकात स्टार स्पोटर्स या वाहिनीवर क्रिकेट एक्स्पर्ट म्हणून काम करत आहे. या व्यस्त कामातून वेळ काढूनही त्याने नुकतंच सहपरिवार चंद्रपुरातील ताडोब अभयारण्यात भेट दिली होती. लाराला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची भुरळ पडल्याने तो चंद्रपुरात गेला होता.
छातीत दुखत असल्याने ब्रायन लारा मुंबईतील रुग्णालयात दाखल #BrianLara pic.twitter.com/7soTSpCJ52
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 25, 2019
वाघ पाहण्यासाठी लारा 11 जूनपासून ताडोबात ठाण मांडून बसला आहे. तो मंगळवारी (11जून) इथे आला असून, एका खासगी रिसॉर्टमध्ये मुक्कामी राहिला होता. याशिवाय चंद्रपुरात त्याने जंगल सफारीचाही आनंद लुटला होता.
कोण आहे ब्रायन लारा?
- ब्रायन लारा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतातील मोठं नाव आहे.
- ब्रायन लारा वेस्ट इंडिजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे.
- त्याने वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचं कर्णधारपद भूषवलं आहे.
- लाराने 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत.
संबंधित बातम्या :
इंग्लंडमध्ये वर्ल्डकपची धामधूम, ब्रायन लारा सहकुटुंब चंद्रपुरात