T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये कोणची टीम असणार? Anand Mahindra यांचे ट्विट व्हायरल
9 नोव्हेंबरला पाकिस्तान आणि न्यूझिलंड यांच्यात मॅच होणार आहे.
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात T20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2022) सुरु झाल्यापासून अनेक दिग्गज आपली भविष्यवाणी सांगत आहेत.जगभरातील क्रिकेटच्या चाहत्यांनी (Cricket Fan) आतापर्यंत अनेक तर्क लढवले आहेत. T20 वर्ल्ड कप आता सेमीफायनलच्या उंबठ्यावर आहे. सेमीफायनलमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, इंग्लंड, न्यूझिलंड या टीम पोहोचल्या आहेत. आनंद महिंद्रा (Anand Mahindra) त्यांच्या सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात, तसेच रोज नव्या गोष्टी शेअर करीत असतात. त्यांनी आता क्रिकेटबाबत एक भविष्यवाणी केली आहे.
9 नोव्हेंबरला पाकिस्तान आणि न्यूझिलंड यांच्यात मॅच होणार आहे. तर 10 नोव्हेंबरला टीम इंडियाची मॅच इंग्लंडसोबत होणार आहे. त्यामुळे सेमीफायनलमध्ये दाखल झालेल्या टीमने कसून सराव सुरु केला आहे. अधिक लोकांनी सोशल मीडियावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल मॅच होईल असं सोशल मीडियावर म्हटलं आहे.
I asked this pooch to look into the future and tell me who would be in the finals of the #T20WorldCup2022 It figured out this ingenious way to look over the ‘wall’ of the present. What do you think it saw? ? pic.twitter.com/a5H5OPRiVU
— anand mahindra (@anandmahindra) November 6, 2022
आनंद महिद्रा यांनी एक ट्विट केलं आहे. विशेष म्हणजे यावेळेचं ट्विट क्रिकेटशी संबंधित आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक कुत्रा भिंतीच्या पलिकडे काहीतरी पाहत आहे. मी या कुत्र्याला भविष्य पाहण्यास सांगितले आणि 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोण असेल असं ट्विटच्या आशयामध्ये लिहिलं आहे. हा व्हिडीओ 6 लाख 24 हजार लोकांनी पाहिला आहे.
त्या व्हिडीओला आनंद महिद्रा यांच्या चाहत्यांनी आणि क्रिकेटच्या चाहत्यांनी कमेंट करुन अनेक प्रश्न विचारले आहेत. विशेष म्हणजे त्या ट्विटची अजून चर्चा सुरु आहे.