AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wrestlers Protest : मोदी सरकारने कुस्तीपटूंच्या नाराजीची दखल घेतली, त्यामागे एक मोठं कारण

Wrestlers Protest : पंतप्रधान मोदींच्या कुठल्या महत्वाच्या दौऱ्याआधी सरकारला हा सर्व वाद मिटवायचाय?. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोपांची चौकशी शेवटच्या टप्प्यात आहे.

Wrestlers Protest : मोदी सरकारने कुस्तीपटूंच्या नाराजीची दखल घेतली, त्यामागे एक मोठं कारण
Wrestlers protest
Follow us
| Updated on: Jun 07, 2023 | 1:14 PM

नवी दिल्ली : कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे सरकार अलर्ट मोडवर आलय. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना चर्चेच निमंत्रण दिलय. सरकारला आता लवकरात लवकर या वादावर तोडगा शोधायचा आहे. हा वाद आणखी न वाढवण्याची सरकारचा प्रयत्न आहे. आज खाप महापंचायत होणार आहे. त्याच्याबरोबर एक दिवस आधी मंगळवारी रात्री अनुराग ठाकूर यांनी टि्वट करुन आंदोलक कुस्तीपटूंना चर्चेसाठी बोलावलं.

याआधी जानेवारी महिन्यात सुद्धा आंदोलक कुस्तीपटू आणि क्रीडा मंत्र्यांमध्ये बैठक झाली होती. आता पुन्हा एकदा सरकारने कुस्तीपटूंना चर्चेसाठी बोलावलय.

कधीपर्यंत सरकारला वाद मिटवायचाय?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलक कुस्तीपटू लवकरच सरकारसोबत चर्चा सुरु करतील. शनिवारी रात्री सुद्धा कुस्तीपटूंनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोपांची चौकशी शेवटच्या टप्प्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याआधी सरकारला हा वाद मिटवायचा आहे.

सरकार आता का वाद मिटवण्याचा प्रयत्न करतेय?

कुस्तीपटूंचा हा वाद आणखी वाढला, तर पक्षाच नुकसान होईल, असं सत्ताधारी भाजपाला वाटतं. 28 मे रोजी जंतर-मंतरवर कुस्तीपटूंना खेचत, ओढत नेल्याचे फोटो समोर आले. त्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसलाय. आंदोलक कुस्तीपटू एक महिन्यापासून दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलनाला बसले होते. पोलिसांकडून परवानगी नसल्यामुळे कुस्तीपटूंच आंदोलन संपलं. पण विरोध अजूनही कायम आहे. सरकारला कुठल्या मतांची चिंता?

कुस्तीपटूंना ओढत-खेचत नेल्याच्या फोटोंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसार झालाय. त्यामुळे भारत सरकारच्या प्रतिमेला धक्का बसलाय. दुसऱ्या बाजूला भाजपाला जाट मतांची चिंता आहे. खाप पंचायती या आंदोलनात उतरल्याने शेतकरी आंदोलनाच्या कटू आठणी ताज्या झाल्या आहेत. त्यामुळे सरकारला लवकरात लवकर हा वाद मिटवायचा आहे.

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.