Champions Trophy खेळणार भारत की पाकिस्तानला सोडावे लागणार यजमान पद; आज होणार फैसला

ICC Meeting Champions Trophy : चॅम्पियन ट्रॉफीचे कवित्व अजून संपलेले नाही. भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या संबंधाचे सावट या ट्रॉफीवर स्पष्ट दिसत आहे. आज दुबईत दुपारी 2:30 वाजता तर भारतीय वेळेनुसार, 4 वाजता आयसीसी बोर्डाची बैठकी होईल. त्यात या नाट्यावर पडदा पडण्याची शक्यता आहे.

Champions Trophy खेळणार भारत की पाकिस्तानला सोडावे लागणार यजमान पद; आज होणार फैसला
आज होणार फैसला
Follow us
| Updated on: Nov 29, 2024 | 10:06 AM

चॅम्पियन ट्रॉफीवरून भारत आणि पाकिस्तान सामन्यांपूर्वीच आमने-सामने आले आहेत. दोन्ही देशातील सध्या ताणलेल्या संबंधाचा स्पष्ट परिणाम त्यावर दिसत आहे. चॅम्पियन ट्रॉपी 2025 चे यजमान पद पाकिस्तानकडे आहे. शेजारील देश त्यासाठी जोरदार तयारी करत आहे. अर्थातच पाकिस्तानमध्ये जाऊन खेळण्यास टीम इंडियाने नकार दिल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. पाकिस्तानसह आयसीसीला झटका बसला आहे. अर्थात या वादावर तोडगा काढण्याची कसरत करावी लागणार आहे. आज याविषयीचा फैसला होण्याची दाट शक्यता आहे. आज दुबईत दुपारी 2:30 वाजता तर भारतीय वेळेनुसार, 4 वाजता आयसीसी बोर्डाची बैठकी होईल. त्यात या नाट्यावर पडदा पडण्याची शक्यता आहे.

हायब्रिड मॉडलचं संकटात

चॅम्पियन ट्रॉफीवर भारत-पाकिस्तान वादाचे सावट दिसले. त्यानंतर आता त्यावर हायब्रिड मॉडलचा तोडगा काढण्याची चर्चा सुरू झाली. आज 29 नोव्हेंबर रोजी आयसीसीची दुबईत याविषयीची बैठक होत आहे. त्यावर हा मुद्दा चर्चेत येणार आहे. दोन्ही देशांना राजी करण्याचं मोठं आव्हान आयसीसीवर असेल. तर दुसरीकडे पाकिस्तानने हायब्रिड मॉडल स्वीकारण्यास अगोदरच नकार दिला आहे. अजून एखादा पर्याय निघू शकतो यावर आजच्या बैठकीत खल होईल.

हे सुद्धा वाचा

तर मग हे दोन पर्याय

पाकिस्तानसोबतच राजकीय संबंध ताणल्या गेल्याने सध्याचे मोदी सरकार चॅम्पियन ट्रॉफीबाबत कितपत अनुकूल असेल हे स्पष्ट आहे. तर दुसरीकडे हायब्रिड मॉडलवर पाकिस्तानची सहमती नाही. अशावेळी दोन पर्याय समोर आहेत. एकतर पाकिस्तानचे यजमान पद काढून ते दुसऱ्या देशाला द्यावे लागेल. अथवा भारताविना चॅम्पियन ट्रॉफी खेळावावी लागेल. पण भारतच या ट्रॉफीमध्ये नसेल तर त्याला अर्थ उरणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अशी चूक करणार नाही. त्यामुळे ही टुर्नामेंट इतर देशात जाण्याची शक्यता अधिक आहे.

आयसीसीची मोठी कसरत

आयसीसीची दुबईत दुपारी 2:30 वाजता आणि भारतीय वेळेनुसार 4 वाजता व्हर्चुअल बैठक होईल. यामध्ये आज आठ संघाविषयी फैसला होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही स्पर्धा पाकिस्तानतच भरवावी की इतर ठिकाणी हा कळीचा मुद्दा असेल. जर भारत या स्पर्धेतून चार हात दूर राहिला तर जाहिरातीतून होणारी कमाई आणि इतर स्पॉन्सरशिपमधून होणाऱ्या कमाईला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तर भारतीय प्रेक्षकांना नाराज करण्याचे धाडस आयसीसी दाखवणार नाही. व्यवहार, व्यापार पातळीवर आयसीसीची आज खरी कसोटी लागणार आहे.

चॅम्पियन ट्रॉफी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च 2025 या दरम्यान आयोजित करण्याची शक्यता आहे. पण सध्या या ट्रॉफीच्या आयोजनावरून वाद सुरू आहे. त्यामुळे अजून सामन्यांचे वेळापत्रक समोर आलेले नाही. पीसीबी अध्यक्षांनी भारताच्या भूमिकेवर काल टीका केली होती. सुरक्षेची सर्व काळजी घेण्यात आली असताना भारत सातत्याने सामने खेळवण्यास नकार देत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. भारत या सामन्यात खेळला नाही तर ही नाराजी आयसीसीला पण भोवू शकते, असा दावा करण्यात येत आहे.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.