IPL2023 : विल्यमसनची सुट्टी, आता कोण होणार SRHचा कर्णधार? हे पर्याय उपलब्ध
कर्णधारपदाच्या यादीत पहिलं नावं भुवनेश्वर कुमारचं आहे.
मुंबई : आयपीएलच्या (IPL2023) 16 व्या सीजनची तयारी सुरु झाली आहे. काल जुने कोणते खेळाडू टीम कायम असणार हे स्पष्ट झाले. अनेक खेळाडूंचं टीममध्ये नाव नसल्यामुळे त्या खेळाडूंसाठी दुसऱ्या टीमचे रस्ते खुल्ले झाले आहेत. विशेष म्हणजे सनराइजर्स हैदराबाद (SRH) या टीमने विल्यमसन (Williamson) या खेळाडूंचं नाव आपल्या अंतिम यादीत घेतलेलं नाही. त्यामुळे सनराइजर्स हैदराबादकडून त्याची सुट्टी करण्यात आल्याचं स्पष्ट झालंय. सनराइजर्स हैदराबाद या टीमच्या कर्णधार पदासाठी अनेक नावं सध्या चर्चेत आहेत.
कर्णधारपदाच्या यादीत पहिलं नावं भुवनेश्वर कुमारचं आहे. कारण अनेक वर्षांपासून तो सनराइजर्स हैदराबाद या टीमचा खेळाडू आहे. विशेष म्हणजे एखाद्या नव्या खेळाडूला कर्णधार पद देण्यापेक्षा भुवनेश्वर कुमारचा विचार होऊ शकतो.
एडेन मार्करम हा आफ्रिकेचा खेळाडू आहे. त्याने 19 वर्षा खालील विश्वचषक आफ्रिकेला जिंकून दिला होता. तो मागच्यावर्षी सनराइजर्स हैदराबाद टीममध्ये दाखल झाला आहे. विशेष म्हणजे सनराइजर्स हैदराबाद टीमला हा सुद्धा एक पर्याय आहे.
जेसन होल्डरची लखनऊ सुपरजाएंट्सकडून सुट्टी झाली आहे. जेसन होल्डर अनेक वर्ष वेस्टइंडीज टीमचा कर्णधार राहिला आहे. फ्रेंचाइजी त्याचाही कर्णधारपदासाठी विचार करु शकते.
मयंक अग्रवाल हा खेळाडू जगदगतीने धावा काढण्यासाठी प्रसिद्ध आहे. गेल्यावर्षी तो पंजाब किंग्सचा कर्णधार होता. पंजाब किंग्सने त्याची यावर्षी सुट्टी केल्यामुळे त्याचा सुद्धा पर्याय सनराइजर्स हैदराबाद टीमकडे आहे. विलियमसन या खेळाडूला मयंक अग्रवाल हा पर्याय ठरू शकतो.