वर्ल्डकप विजेत्या टीम इंडियाच्या क्रिकेटपटूची आणखी एक किमया, गावातून कोरोनाला केलं हिट विकेट!

माजी क्रिकेटपटू मुनाफ पटेल याने सूत्रे आपल्या हाती घेतली आणि कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये, यासाठी आपल्या इखार गावाला जागरुक करण्याची काळजी घेतली

वर्ल्डकप विजेत्या टीम इंडियाच्या क्रिकेटपटूची आणखी एक किमया, गावातून कोरोनाला केलं हिट विकेट!
Follow us
| Updated on: Jul 22, 2020 | 6:05 PM

गांधीनगर : टीम इंडियाला 28 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर वर्ल्डकप जिंकण्यास मदत करणाऱ्या माजी क्रिकेटपटूने गावातून ‘कोरोना’लाही हिट विकेट करण्याची कठीण किमया साधली. ‘इखार एक्स्प्रेस’ अशी बिरुदावली मिरवणारा हा मुंबई इंडियन्सचा माजी गोलंदाज आहे मुनाफ पटेल. (World Cup Winner Team India Ex Cricket Player Munaf Patel Hit Wicket Corona from Ikhar Village)

शोएब अख्तरप्रमाणे 160 किमी ताशी वेगाने गोलंदाजी करण्याचे स्वप्न मुनाफ पटेलने पाहिले होते, आणि 144 किमी प्रतितास वेगाने बॉलिंग करत ‘इखार एक्स्प्रेस’ अशी ख्यातीही त्याने मिळवली. मात्र मुनाफ एप्रिलमध्ये गुजरातमधील भरुच जिल्ह्यातील आपल्या इखार गावात गेला, तेव्हा छोट्याशा खेड्यातील गावकऱ्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्यास उद्युक्त करणे निश्चितच सोपे नव्हते.

जेमतेम 8000 लोकसंख्या असलेले इखार हे छोटेसे गाव. एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात इखारपर्यंत कोरोनाचा ‘को’ही पोहोचला नव्हता. मात्र पाच जणांची कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली आणि गाव हादरले.

इखार हे संपूर्ण तालुक्यातील एकमेव गाव होते ज्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले, त्यामुळे गावालाच कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले. अशा वेळी दहशतीत असलेल्या गावाला सोशल डिस्टन्सिंग किंवा शारीरिक अंतर राखण्याचे आणि मास्क लावण्याचे महत्त्व  पटवणे सोपे नव्हते.

अखेर, 38 वर्षीय मुनाफने सूत्रे आपल्या हाती घेतली. कोरोना व्हायरसचा संसर्ग आणखी वाढू नये, यासाठी आपल्या खेड्याला जागरुक करण्याची काळजी त्याने घेतली. मुनाफच्या प्रयत्नांना आलेल्या यशाची पावती म्हणजे इखारमध्ये सुरुवातीच्या पाच केसेस वगळता नंतर एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही. (World Cup Winner Team India Ex Cricket Player Munaf Patel Hit Wicket Corona from Ikhar Village)

“जेव्हा लॉकडाऊन जाहीर झाला, तेव्हा इखारला कोरोना विषाणूबद्दल फारशी कल्पना नव्हती. एप्रिल महिन्यात तामिळनाडूहून इखारला आलेल्या पाच जणांना लागण झाल्याचे समजले आणि गावात अचानक भीतीचे वातावरण निर्माण झाले” असे मुनाफ सांगतो.

मुनाफ पटेल हा इखारमधील रोल मॉडेल असल्याने स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी त्याला हाताशी धरत जनजागृती केली. “नियमितपणे अंतर राखणे ही ग्रामस्थांसाठी नवी संकल्पना होती. त्यांना वाटत होते की आपल्याला लक्ष्य केले जात आहे. मला त्यांना विषाणूचे धोके समजावून सांगावे लागले” असेही मुनाफ म्हणाला. त्याने मास्कचे महत्त्व समजावून सांगितले.

“सर्वात आव्हानात्मक क्षण तो होता, जेव्हा माझ्या गावातल्या शेतकऱ्यांना एप्रिलमध्ये पिकाची कापणी करायची होती. मात्र मोठ्या गटात जमल्यास त्यांना संसर्ग होण्याचा धोका असल्याने त्यांना लॉकडाऊनच्या बाहेर जाऊ दिले नाही” असे मुनाफ म्हणाला. मुनाफने मध्यस्थी करत स्थानिक पोलीस आणि आरोग्य अधिकाऱ्यां समजावले की सर्व जण सोशल डिस्टन्सिंगचे पालन करतील.

मुनाफ दररोज पंचायत कार्यालयात जाऊन तासनतास कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चर्चा करायचा. गावकरी त्याच्या सूचनांचे पालन करत गेले आणि कोरोनाला पुन्हा वेशीतून आत येऊ दिले नाही, असे मुनाफ म्हणतो.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

“क्वारंटाईन होण्याच्या भीतीने सर्दी-खोकला झाल्यावरही अनेक जण टेस्ट करण्यास घाबरत होते. मात्र मुनाफने त्यांची समजूत काढली आणि गावकऱ्यांनी सामंजस्य दाखवलं. अशाप्रकारे कोरोनाविरुद्धच्या सामन्यात मुनाफच्या नेतृत्वात गावाने विजय मिळवला. (World Cup Winner Team India Ex Cricket Player Munaf Patel Hit Wicket Corona from Ikhar Village)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.