वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार! दुसऱ्या कसोटी विजयामुळे असं बदललं गणित

World Test Championship: भारताने दुसरा कसोटी सामना तिसऱ्या दिवशीच आपल्या खिशात घातला. यामुळे भारतीय संघानं आयसीसी टेस्ट गुणतालिकेत आपली स्थिती कायम ठेवली आहे. भारताने कसोटी मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार! दुसऱ्या कसोटी विजयामुळे असं बदललं गणित
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारताची आगेकूच, आयसीसी गुणतालिकेत असा पडला फरक Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Feb 19, 2023 | 2:23 PM

मुंबई : बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील सलग दुसरा कसोटी सामना भारताने आपल्या खिशात घातला. या विजयासह भारताने मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. भारताने पहिला कसोटी सामना एक डाव आणि 132 धावांनी जिंकला होता. त्यानंतर आता दुसरा कसोटी सामना भारताने 6 गडी राखून जिंकला आहे. मोठ्या विजयामुळे भारताला आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिप गुणतालिकेत जबरदस्त फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात आता फक्त दोन अंकांचा फरक पडला आहे. त्यामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम फेरीचा सामना रंगणार असंच चित्र दिसत आहे. आयससीसी गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर, तर भारतानं आपलं दुसरं स्थान कायम ठेवलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने भारताला ही कसोटी मालिका 3-0 ने जिंकायची आहे. भारतासाठी तिसरा कसोटी सामना महत्त्वाचा आहे.

आयसीसी गुणतालिका आणि गणित

ऑस्ट्रेलिया 66.67 गुणांसह अव्वल स्थानी आहे. दुसऱ्या कसोटीतील पराभवामुळे ऑस्ट्रेलियाच्या गुणांवर मात्र फरक पडला. पण मालिका पराभूत झाल्यास जास्तीत जास्त दुसऱ्या स्थानी येऊ शकते. भारत 64.06 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 3-0 नं जिंकायची आहे. तिसऱ्या स्थानी 53.33 गुणांसह श्रीलंका आहे. तर चौथ्या स्थानी 48.72 गुणांसह दक्षिण आफ्रिका आहे. भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका गमवल्यास श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेच्या पराभवावर गणित अवलंबून असणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप उरलेले सामने

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (तिसरा कसोटी सामना) – होळकर स्टेडियम, इंदौर, भारत, 1-5 मार्च
  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (चौथा कसोटी सामना) – अहमदाबाद, भारत, 9-13 मार्च
  • दक्षिण अफ्रीका विरुद्ध वेस्टइंडीज (पहिला कसोटी सामना) – सेंचुरियन, दक्षिण अफ्रीका, 28 फेब्रुवारी-4 मार्च
  • दक्षिण अफ्रीका विरुद्ध वेस्ट इंडीज (दुसरा कसोटी सामना) – जोहान्सबर्ग, दक्षिण अफ्रीका, 8-12 मार्च
  • न्यूझीलँड विरुद्ध श्रीलंका (पहिला कसोटी सामना) – क्राइस्टचर्च, न्यूजीलँड, 9-13 मार्च
  • न्यूझीलँड विरुद्ध श्रीलंका (दुसरा कसोटी सामना) – वेलिंगटन, न्यूजीलँड, 17-21 मार्च

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची अंतिम फेरीची तारीख

फायनल मॅचचं आयोजन हे 7 ते 11 जूनदरम्यान करण्यात आलं आहे. सामन्यात कोणत्याही कारणाने व्यत्यय आल्याने वेळ वाया जातो. आयसीसीने असं झाल्याने दोन्ही संघांचं नुकसान होऊ नये, यासाठी 1 राखीव दिवसही ठेवला आहे. जून 12 हा राखीव दिवस ठेवला आहे.

दुसरा कसोटी सामन्यातील विजय

दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. तसेच सर्वबाद 263 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजी आलेल्या भारताने 262 धावा केल्या. यामुळे ऑस्ट्रेलियाकडे एका धावेची आघाडी होती.दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी अक्षरश:ढेपाळली. ऑस्ट्रेलियाने 113 धावा आणि 1 धाव मिळून एकूण 114 धावा केल्या.भारतासमोर विजयासाठी 115 धावांचं आव्हान ठेवलं. भारतानं हे आव्हान 4 गडी गमवून तिसऱ्या दिवशीच पूर्ण केलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.