Wrestler Satender Malik : पैलवान सतेंदर मलिकवर आजीवन बंदी, कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या चाचण्यांवेळी पंचाला मारहाण करणं महागात

125 किलो वजनी गटात आपला दावा मांडणाऱ्या कुस्तीपटू सतींदर मलिकने (Wrestler Satender Malik) वरिष्ठ रेफ्रीशी गैरवर्तन केले आणि सामन्याचा निर्णय त्याच्या विरोधात गेल्यावर त्यांना मारहाण केली.

Wrestler Satender Malik : पैलवान सतेंदर मलिकवर आजीवन बंदी, कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या चाचण्यांवेळी पंचाला मारहाण करणं महागात
पैलवान सतेंदर मलिकवर आजीवन बंदीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 5:15 PM

नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीत बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 (CWG 2022) साठी चाचण्या केल्या जात आहेत. भारतीय कुस्ती महासंघ (WFI) तर्फे केडी जाधव स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये मंगळवारी कुस्तीपटू बाजी मारत होते, परंतु यादरम्यान अशी परिस्थिती उद्भवली ज्यामुळे सर्वजण थक्क झाले. या चाचण्यांवेळी 125 किलो वजनी गटात आपला दावा मांडणाऱ्या कुस्तीपटू सतींदर मलिकने (Wrestler Satender Malik) वरिष्ठ रेफ्रीशी गैरवर्तन केले आणि सामन्याचा निर्णय त्याच्या विरोधात गेल्यावर त्यांना मारहाण केली. त्याच्या या कृत्याने कुस्ती महासंघालाही चांगलाच धक्का बसला आणि महासंघाने तातडीने कठोर कारवाई करत सतेंदरवर आजीवन बंदी घातली. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता त्याला कॉमनवेल्थ गेम्स 2022 तर सोडा इतर कोणत्याही कुस्ती स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.

नेमका प्रकार काय घडला?

सतेंदर मलिक हा सुरूवातील आघाडीवर होता, मा काही वेळातच मोहीतने त्याला मॅटच्या बाहेर ढकललं. पंचांनी त्याला कोणतेही गुण दिले नाही. त्याने पंचाच्या या निर्णयाला आव्हान दिले. त्याने निष्पक्षतेचा आरोप करत या निर्णयापासून हात झटकले. सतेंदर मोखडा त्याच गावचा आहे. ज्याठिकाणातून सतेंदर मलिकही येतो. त्यानंतर अनुभवी पंच जगबीर सिंह यांनी या वॉर्निंगकडे त्याचे लक्ष वेधले. त्यांनी टिव्ही रिप्लेचा आधार घेत मोहीतला तीन गुण देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघांचेही आकडे गुण समान राहिले मात्र शेवटी मोहीतला विजयी घोषित करण्यात आले. या निर्णयामुळे सतेंदरचा संयम सुटला आणि तो 57 किलो वजनाच्या सामन्याच्या मॅटवर गेला जिथे रवी दहिया आणि अमन यांच्यात अंतिम सामना होत होता तिथे जगबीर देखील उपस्थित होते.

वाद मारहाणीत बदलला

सतेंदरने जगबीरला गाठून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने आधी शिवीगाळ केली आणि नंतर जगबीर यांना चापट मारली, त्याचा तोल गेला आणि तो जमिनीवर पडला. यानंतर 57 किलोचा सामना थांबवण्यात आला कारण या घटनेनंतर इंदिरा गांधी स्टेडियमच्या केडी जाधव हॉलमध्ये गोंधळ झाला. हे पाहून अनेकांना धक्का बसला. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अधिकाऱ्यांनी सतेंदरला सभागृहाबाहेर पाठवले आणि सामना पुन्हा सुरू केला. मंचावर बसलेले डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या डोळ्यासमोर हे सर्व घडत होते. WFI सहाय्यक सचिव विनोद तोमर म्हणाले की आम्ही सतेंदर मलिकवर आजीवन बंदी घातली आहे. WFI अध्यक्षांनी हा निर्णय घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.