India Tour Australia | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी टीम इंडियाला मोठा दिलासा, ‘हा’ स्टार खेळाडू दुखापतीतून सावरला

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

India Tour Australia | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी टीम इंडियाला मोठा दिलासा, 'हा' स्टार खेळाडू दुखापतीतून सावरला
Follow us
| Updated on: Nov 14, 2020 | 11:10 PM

सिडनी : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी  (India Tour Australia) सिडनीमध्ये पोहचली आहे. अवघ्या काही दिवसांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिाविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यानंतर टीम इंडिया अनुक्रमे टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. या कसोटी मालिकेआधी टीम इंडियाला मोठा दिलासा मिळाला आहे. टीम इंडियाचा विकेटकीपर ऋद्धीामान साहा हेमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरला आहे. म्हणजेच ऋद्धीमानच्या गुडघ्यामागील स्नायूंना दुखापत झाली होती. यातून तो सावरला असल्याची माहिती बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने दिली आहे. wriddhiman saha recovers from hamstring injury ahead of test series against australia says bcci president sourav ganguly

गांगुली काय म्हणाला?

“ऋद्धीमान दुखापतीतून हळूहळू सावरतोय. तो लवकरच यातून उभारेल. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत सहभागी होईल, असा आशावाद गांगुलीने व्यक्त केला. लोकांना माहिती नाही की बीसीसीआय कशाप्रकारे काम करते. साहा दोन हेमस्ट्रिंग दुखापतीचा सामना करतोय. मात्र तो कसोटी मालिकेपर्यंत निश्चित बरा होईल”, असंही गांगुलीने म्हटलं.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऋषभ पंतची विकेटकीपर म्हणून निवड करण्यात आली आहे. ऋद्धीमान जर दुखापतीतून सावरला नाही, तर पंतला साहाच्या जागी संधी मिळू शकते.

ऋद्धीमानला आयपीएल 2020 स्पर्धेदरम्यान ही दुखापत झाली होती. प्लेऑफचा दुसरा सामना दिल्ली विरुद्ध हैदराबाद यांच्यात खेळण्यात आला होता. या सामन्यातील टॉसदरम्यान कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ऋद्धीमानच्या दुखापतीबाबात माहिती दिली होती. “ऋद्धीमान अजून दुखापतीतून सावरला नाहीये. त्याला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली आहे”, अशी माहिती वॉर्नरने दिली होती. या दुखापतीमुळे ऋद्धीमानला एलिमिनेटर सामन्याला मुकावे लागले होते.

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा

एकदिवसीय (वनडे) मालिका

पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

टी-20 मालिका

पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी

कसोटी (टेस्ट) मालिका

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

संबंधित बातम्या :

IND vs AUS : के एल राहुलचं प्रमोशन, टीम इंडियाच्या उपकर्णधारपदाची धुरा

India Tour Australia | आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाकडून संधी

wriddhiman saha recovers from hamstring injury ahead of test series against australia says bcci president sourav ganguly

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.