Yuvraj Singh retired : मैदानात रक्ताची उलटी करुनही वर्ल्डकप जिंकून देणारा ढाण्या वाघ!

2011 च्या वर्ल्डकप दरम्यान उपांत्यपूर्व सामन्यात युवराजला भर मैदानात रक्ताच्या उलट्या झाल्या. मात्र याबाबत कोणलाही कल्पना लागली  नाही.

Yuvraj Singh retired : मैदानात रक्ताची उलटी करुनही वर्ल्डकप जिंकून देणारा ढाण्या वाघ!
Follow us
| Updated on: Jun 10, 2019 | 3:32 PM

मुंबई : युवराज सिंह म्हटलं की, आपल्याला आठवतं सहा चेंडू सहा षटकार.. पण यापुढे क्रिकेटच्या चाहत्यांना ‘सिक्सर किंग’ युवराज सिंहची ही जादू किंवा त्याचा खेळ अनुभवता येणार नाही. कारण टीम इंडियाचा खेळाडू युवराज सिंहने क्रिकेटच्या सर्व प्रकरातून निवृत्ती जाहीर केली आहे. आज 10 जूनला मुंबईत पत्रकार परिषद घेत त्याने निवृत्तीची घोषणा केली. यावेळी तो काहीसा भावूक झाला.

सध्या इंग्लंडमध्ये क्रिकेट विश्वचषक 2019  रंगत असतानाच युवराज सिंगने निवृत्तीची घोषणा केली आहे. यामुळे भारतीय चाहते नाराज झाले आहेत. भारताने जिंकलेल्या टी 20 आणि 2011 मध्ये जिंकलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये युवराज सिंहने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र 2011 च्या वर्ल्डकप दरम्यान उपांत्यपूर्व सामन्यात युवराजला भर मैदानात रक्ताच्या उलट्या झाल्या. मात्र याबाबत कोणलाही कल्पना लागली  नाही.

सिक्सर किंग युवराज हा 2011 च्या विश्वचषकातील महत्त्वाचा खेळाडू मानला जातो. या विश्वचषकातील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा उपांत्यपूर्व सामना गुजरातच्या अहमदाबादच्या सरदार पटेल मैदानात खेळण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 260 धावा केल्या होत्या. त्याचा पाठलाग करताना भारताने 261 धावा करत विजय मिळवला.

मात्र या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीदरम्यान युवराज सिंहला रक्ताच्या उलट्या होत होत्या. एका बाजूला भारताचे गोलंदाज गोलंदाजी करत होते. तर दुसऱ्या बाजूला युवराज सिंहला रक्ताच्या उलट्या होत होत्या. याचं कारण म्हणजे कॅन्सर….मात्र त्या परिस्थितीतही तो डगमगला नाही. विशेष म्हणजे युवराजला रक्ताच्या उलट्या झाल्या. मात्र त्याने याबाबत कोणालाही सांगितले नाही.

तब्बल 28 वर्षानंतर विश्वचषक पुन्हा आपल्या नावे करण्याची भारताला ही एकमेव संधी होती. या विश्वचषकात युवराजने 8 सामने खेळले. त्यात त्याने 365 धावा केल्या. विशेष म्हणजे त्याने या सामन्यात गोलंदाजीही केली. 9 सामन्यात त्याने 15 खेळांडूना माघारी धाडले. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही मिळाला होता. त्यामुळे “जर युवराज या वर्ल्ड कप दरम्यान खेळला नसता, तर कदाचित मास्टर ब्लास्टर सचिनचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अधुरं राहिलं असतं असं म्हटलं जातं”.

वर्ल्ड कप जिंकल्यानंतर युवराज कॅन्सरच्या उपचारासाठी अमेरिकेत निघून गेला. यानंतर अनेकांनी तो पुन्हा कधीच खेळू शकणार नाही, त्याने निवृत्ती घ्यावी असे सांगितले होते. मात्र युवराजने कॅन्सरशी यशस्वीपणे झुंज दिली आणि पुन्हा त्याच जोशात क्रिकेटच्या मैदानात उतरला. क्रिकेटमध्ये दुसऱ्या संघांना धूळ चारण्यात यशस्वी ठरलेल्या युवराजने खऱ्या आयुष्यात कॅन्सरसारख्या आजारालाही मात दिली.

युवराज सिंहची क्रिकेट कारकीर्द

भारताने जिंकलेल्या टी 20 आणि 2011 मध्ये जिंकलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये युवराज सिंहने महत्त्वाची भूमिका बजावली होती. कॅन्सरचं निदान होऊनही युवराज सिंह ढाण्या वाघासारखा लढला होता.

युवराज सिंहने भारताकडून 304 वन डे सामन्यात 8701 धावा केल्या आहेत. यामध्ये 14 शतकं आणि 52 अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय युवराजने 40 कसोटी सामन्यात 1900 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतकं आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. तर टी 20 स्पेशालिस्ट युवराजने 58 सामन्यात 8 अर्धशतकांसह 1177 धावा केल्या आहेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.