Chahal-Dhanashree Divorce : अखेर चहल-धनश्रीच्या घटस्फोटाच खरं कारण आलं समोर!
Chahal-Dhanashree Divorce : चहल-धनश्रीचा घटस्फोट झाला आहे. पण यामागच खरं कारण काय आहे? हे अजून कोणाला समजलेलं नाही. आता एक नवीन रिपोर्ट समोर आलाय. त्यातून दोघांच वैवाहिक नातं संपुष्टात येण्यामागच खरं कारण समोर आलय. या रिपोर्टमध्ये काय म्हटलय, जाणून घ्या.

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला आहे. 20 मार्चला या दोघांचा घटस्फोट झाला. पण या घटस्फोटाच खरं कारण काय आहे? हे अजून कोणाला कळलेलं नाही. दोघांनी परस्पर सहमतीने घटस्फोट घेतलाय, इतकीच माहिती आहे. पण आता एक नवीन रिपोर्ट समोर आलाय. त्यातून त्यांचं वैवाहिक नातं संपुष्टात येण्यामागच खरं कारण समोर आलय. रिपोर्टनुसार दोघांमध्ये कुठे रहायचं? त्यावरुन मतभेद होते. त्यामुळे या दोघांनी सेप्रेट होण्याचा निर्णय घेतला.
एंटरटेनमेंट पत्रकार विकी लालवानी यांच्यानुसार रहाण्याची जागा हे चहल आणि धनश्री यांच्यात मतभेदाच एक कारण ठरलं. आपण कुठे रहायचं? यावरुन दोघांमध्ये एकमत नव्हतं. त्यामुळे त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर 2020 मध्ये लग्न झाल्यानंतर धनश्री, हरियाणाला चहलच्या घरी गेली. तिथे ती चहल आणि त्याच्या पालकांसोबत राहत होती. काही दिवसांनी धनश्रीने मुंबईत राहण्याची इच्छा व्यक्त केली. रिपोर्टनुसार, चहलला हीच गोष्ट पटली नाही.
नात्याचा शेवट होण्याचं कारण काय?
चहलशी लग्न केल्यानंतर धनश्री त्याच्या हरियाणाच्या निवासस्थानी राहत होती, असा विकी लालवानीने आपल्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे. काम असेल तेव्हा, किंवा येणं गरजेच आहे, अशाच वेळी ती मुंबईला यायची. मुंबई की, हरियाणा या भांडणामुळे त्यांच्या नात्याचा शेवट झाल्याचा दावा विकी लालवानी यांनी केला आहे. चहलला त्याच्या आई-वडिलांपासून वेगळं राहयचं नव्हतं. त्याला तिथेच हरियाणात रहायचं होतं, असं विकी लालवानीने म्हटलं आहे.
उर्वरित रक्कम लवकरच धनश्रीला मिळेल
या दाव्याला चहल, धनश्री किंवा त्यांच्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याने दुजोरा दिलेला नाही. त्यांच्या घटस्फोटाच्या अधिकृत स्टेटमेंटमध्ये फक्त इतकच म्हटलं होतं की, त्यांनी परस्पर सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. IPL 2025 चा सीजन सुरु होण्याच्या बरोबर दोन दिवस आधी मुंबईतील वांद्रे येथील फॅमिली कोर्टात दोघांचा घटस्फोट मंजूर झाला. घटस्फोट प्रक्रियेनुसार युजवेंद्र चहलला धनश्रीला 4.75 कोटी रुपयांची पोटगी द्यावी लागली. रिपोर्ट्नुसार चहलने धनश्रीला 2.37 कोटी रुपये आधीच दिले आहेत. उर्वरित रक्कम तो लवकरच धनश्रीला देईल.