IPL 2020 | “इट शूड बी असा पाय पडला पाहिजे”, श्रीरामपूरच्या झहीरचे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना मराठीत धडे

झहीर खान मुंबई इंडियन्सचा बोलिंग कोच आहे | (Zaheer Khan is teaching bowling lessons in Marathi)

IPL 2020 | इट शूड बी असा पाय पडला पाहिजे, श्रीरामपूरच्या झहीरचे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना मराठीत धडे
Follow us
| Updated on: Sep 30, 2020 | 7:34 PM

दुबई : आयपीएलच्या 13 व्या मोसमाची सुरुवात झाली आहे. प्रत्येक संघाने आतापर्यंत 2 किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळले आहेत. काही संघांची सुरुवात चांगली झाली. तर काही संघाची निराशाजनक सुरुवात झाली आहे. प्रत्येक संघ आपल्या आगामी सामन्यासाठी नेट्समध्ये कसून सराव करत आहेत. भारताचा आणि मुंबई इंडियन्स संघाचा माजी गोलंदाज झहीर खान आता प्रशिक्षकाची भूमिका बजावतोय. तो मुंबई इंडियन्सचा बोलिंग कोच आहे. झहीर खान मुंबईचा गोलंदाज दिग्विजय देशमुखला अचूक बोलिंग कशी टाकायची, याचे धडे माय मराठीतून देतोय. सरावादरम्यानचा हा व्हिडिओ मुंबई इंडियन्से आपल्या फेसबुकवरुन शेअर केला आहे. (Zaheer Khan is teaching bowling lessons in Marathi)

मुंबईचा बोलर दिग्विजय देशमुखला बोलिंग प्रॅक्टीस करताना काही अडचणी येत होत्या. यानंतर झहीरने दिग्विजयला कानमंत्र दिला.

झहीर दिग्विजयला काय म्हणाला ?

योग्यरित्या बोलिंग कशी करायची याबाबत झहीरने दिग्विजयला कानमंत्र दिला. बोलिंग करताना सातत्याने अनेकदा एकसारखाच बॉल टाकायचा. त्यामुळे आपण नक्की कुठे चुकतोय, हे लक्षात येतं, असं झहीर म्हणाला. तसंच बोलिंगमध्ये बदल करु शकतोस. यॉर्कर बॉल टाकायचा सराव करायचा असेल, तेव्हा फक्त नि फक्त यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे नेमका बोलचा अचूक टप्पा कुठे टाकायचा, याबद्दल तुला जास्त समजेल, असं झहीर दिग्विजयला उद्देशून म्हणाला.

झहीर खानची आयपीएल कारकिर्द

झहीर खानने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे प्रतिनिधित्व केलं आहे. झहीर आयपीएलच्या एकूण 10 मोसमात खेळला आहे. यात त्याने एकूण 100 सामने खेळले आहेत. यामध्ये झहीरने 102 विकेट्स घेतल्या आहेत. 17 धावा देऊन 4 विकेट्स ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.

मराठमोळा झहीर अहमदनगरच्या श्रीरामपूरचा

झहीर खान हा मूळचा उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगरमधील श्रीरामपूरचा सुपूत्र आहे. झहीर खानने आपल्या क्रिकेटची सुरुवात श्रीरामपूरमधून केली. झहीरने काही वर्षांपूर्वी मराठी अभिनेत्री सागरिका घाटगेशी विवाह केला. दरम्यान क्रिकेटमधील योगदानासाठी झहीरला 2019 मध्ये पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता.

संबंधित बातम्या :

IPL 2020, RR vs KKR Live Score : राजस्थान रॉयल्सची विजयी घौडदौड कोलकाता नाईट रायडर्स रोखणार?

(Zaheer Khan is teaching bowling lessons in Marathi)

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.