क्रिकेटसाठी कायपण! शूज चिकवटून खेळणाऱ्या झिम्बाम्वेच्या संघाला ‘प्युमा’ने पाठवलं गिफ्ट
एकेकाळी क्रिकेटविश्वात बऱ्यापैकी स्थान असलेल्या झिम्बाम्वेच्या संघाची अवस्था सध्या बिकट आहे. | Zimbabwe shoes Ryan Burl
मुंबई: एकेकाळी क्रिकेटविश्वात बऱ्यापैकी स्थान असलेल्या झिम्बाम्वेच्या संघाची अवस्था सध्या बिकट आहे. काही दिवसांपूर्वीच झिम्बाम्वेचा (Zimbabwe) खेळाडू रायन बर्ल (Ryan Burl) याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्याने आम्हाला प्रत्येक क्रिकेट (Cricket) सिरीजनंतर बुट चिकटवून घ्यावे लागतात. त्यामुळे आम्हाला शूजसाठी कोणीतरी स्पॉन्सरशिप द्यावी, अशी विनंती रायन बर्ल याने केली होती. (Glue Our Shoes Back After Every Series imbabwe Cricketer Makes Shocking Revelation)
ही पोस्ट प्युमा कंपनीतील अधिकाऱ्यांच्या नजरेस पडली. त्यानंतर प्युमा कंपनीने झिम्बाम्वेच्या क्रिकेट संघाची मदत करायचे ठरवले. रायन बर्लच्या पोस्टनंतर अवघ्या काही तासांमध्ये प्युमा कंपनीने झिम्बाम्वेच्या संघाला शूज पाठवले. हे शूज तुमच्या जर्सीला मॅच होतील, अशी आशा आहे, असे प्युमा कंपनीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Any chance we can get a sponsor so we don’t have to glue our shoes back after every series @newbalance @NewBalance_SA @NBCricket @ICAssociation pic.twitter.com/HH1hxzPC0m
— Ryan Burl (@ryanburl3) May 22, 2021
अलीकडच्या काळात ट्वेन्टी-20 क्रिकेटमुळे अनेक तरुण क्रिकेटपटुंना उत्पन्न मिळू लागले आहे. मात्र, झिम्बाम्वेसारख्या क्रिकेट हा खेळ तितकासा लोकप्रिय नसलेल्या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचल्यानंतही खेळाडुंना मुलभूत सुविधांसाठी झगडावे लागते, हे स्पष्ट झाले आहे.
नेटकऱ्यांचा झिम्बाम्वेला पाठिंबा
रायन बर्लच्या पोस्टनंतर अनेक क्रिकेटप्रेमींनी झिम्बाम्वेच्या संघाला मदत करण्याचे आवाहन केले. भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी झिम्बाम्वेत होणाऱ्या मालिका पुढे ढकलू नयेत. या सिरीजमुळेच झिम्बाम्वेच्या खेळाडुंना अनुभव आणि पैसा मिळू शकतो. एकेकाळी झिम्बाम्वेचा संघ खरंच उत्तम होता. मात्र, सध्याही या संघात अनेक चांगले खेळाडू असतील, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली.
Express shipment for @ryanburl3 and his mates. I hope the colours match the jersey. pic.twitter.com/Df8jxVQ8B3
— PUMA Cricket (@pumacricket) May 24, 2021
कोण आहे रायन बर्ल?
रायन बर्ल याने झिम्बाम्वेच्या संघाची अवस्था समोर आणल्यानंतर अनेकांना धक्काच बसला होता. एकेकाळी क्रिकेटविश्वात नावाजलेल्या संघावर शूज चिकटवून खेळण्याची वेळ येणे, ही गोष्ट अनेकांच्या मनाला लागली होती. मात्र, आता रायन बर्लच्या पोस्टनंतर झिम्बाम्वेच्या संघासाठी सकारात्मक हालचाली होताना दिसत आहेत.
रायन बर्ल याने 2017 साली क्रिकेटविश्वात पदार्पण केले होते. रायन बर्ल याने आतापर्यंत तीन कसोटी सामने, 18 एकदिवसीय सामने आणि 25 ट्वेन्टी-20 सामने खेळले आहेत. नुकत्याच पाकिस्तानविरुद्ध झालेल्या ट्वेन्टी-20 मालिकेत तो झिम्बावेच्या संघात होता.
(Glue Our Shoes Back After Every Series Zimbabwe Cricketer Makes Shocking Revelation)