जिओच्या ग्राहकांना खास सुविधा, 5000 GB पर्यंत एक्स्ट्रा डेटा आणि बरंच काही

मोबाईलवर लोकांची चांगल्याप्रकारे करमणूक व्हावी यासाठी रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना खास सुविधा देणार आहे (Jio special offer on Lockdown).

जिओच्या ग्राहकांना खास सुविधा, 5000 GB पर्यंत एक्स्ट्रा डेटा आणि बरंच काही
Follow us
| Updated on: Mar 31, 2020 | 8:10 PM

मुंबई : कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे (Jio special offer on Lockdown). कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण नागरिक घरातच आहेत. घरात नागरिकांसाठी मोबाईल हा करमणुकीचा एक महत्त्वाचं साधन आहे. मोबाईलवर लोकांची चांगल्याप्रकारे करमणूक व्हावी यासाठी रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना खास सुविधा देणार आहे (Jio special offer on Lockdown).

जिओच्या विशेष सुविधा

जिओच्या ग्राहकांना 17 एप्रिल 2020 पर्यंत 100 मिनिटे कॉल आणि 100 एसएमएस फ्रीची सुविधा मिळणार आहे. रिचार्जचा कालावधी संपल्यानंतरही जिओ ग्राहकांची इन्कमिंगची सुविधा सुरु राहणार आहे. जिओ फायबरच्या प्लॅन्समध्ये 5000 GB पर्यंत एक्स्ट्रा डेटा मिळणार आहे. याशिवाय काही ठिकाणी 10 Mbps स्पीडसोबत बेसिक ब्रॉडबँड कनेक्टिविटीदेखील दिली जाणार आहे.

जिओचे ग्राहक मोठ्या संख्येने ऑनलाईन रिचार्ज करतात. अनेक ग्राहक आपले मित्र आणि नातेवाईकांचे फोनही ऑनलाईनच रिचार्ज करतात. जे ग्राहक नेहमी जिओ स्टोर किंवा रिटेल स्टोरच्या माध्यमातून रिचार्ज करतात त्यांच्यासाठी जिओने नवी सुविधा सुरु केली आहे. रिटेल स्टोरच्या माध्यमातून रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांसाठी UPI, ATM, SMS, Call इत्यादी सुविधा सुरु करण्यात आल्या आहेत. या सुविधांमार्फत ते मोबाईल रिचार्ज करु शकणार आहेत.

‘कोरोना’ची लक्षणं एका क्लिकवर तपासा, रिलायन्स जिओचे ‘Corona Symptoms Checker’

रिलायन्स इंडस्ट्रीने कोरोना विषाणूसोबत लढण्यासाठी अनेक महत्त्वाची पावलं उचललेली आहेत. रिलायन्सने नुकतेच एक नवे ‘MyJioApp’ लाँच केले आहे. तसेच या अॅपमध्ये ‘कोरोना विषाणू इन्फो अँड टूल’ जोडले आहे. या माध्यमातून आता एका क्लिकवर तुम्हाला कोरोनाबद्दलची संपूर्ण माहिती मिळणार आहे. रिलायन्सचा हा अॅप आता रिलायन्सशिवाय इतर यूझर्सही वापरु शकणार आहेत. हा अॅप इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला जिओचे ग्राहक असण्याची गरज नाही.

या इन्फो टूलसाठी MyJioApp च्या हॅमबर्गर मेन्यूवर जाऊन अॅक्सेस केला जाऊ शकतो. टूलवर क्लिक करताच तुम्हाला मेसेज दिसेल ज्यामध्ये कोरोना विषाणू या आजाराबद्दल माहिती दिली आहे.

टेस्ट सेंटर आणि हेल्पलाईन नंबर

या अॅपमधील नवीन फीचरमध्ये तुम्ही कोरोना आजाराची लक्षणं चेक करु शकता, टेस्ट सेंटर्सची यादी, रुग्णांची संख्या, हेल्पलाईन नंबर आणि FAQ सारखे अनेक ऑप्शन यामध्ये दिलेले आहेत. या अॅपमध्ये देशात जिथे जिथे कोरोनाची तापसणी सुरु आहे अशा सर्व लॅबची यादी आणि पत्ता दिला आहे. तसेच हेल्पलाईन ऑप्शनवर क्लिक करुन यूझर्स हेल्पलाईन नंबरची यादीही पाहू शकतो.

या अॅपच्या माध्यमातून यूझर्स कोरोना संबंधित सर्व प्रश्नांची उत्तर मिळवू शकतो. भारतात कोरोना रुग्णांची संख्या किती, किती रुग्ण बरे झाले आणि आतापर्यंत किती रुग्णांचा मृत्यू झाला ही सर्व माहिती या अॅपवर मिळेल. ही संपूर्ण माहिती तज्ञ डॉक्टर आणि प्रशासनाद्वारे अधिकृत माहिती दिली जाणार आहे.

संबंधित बातम्या :

Corona | रिलायन्सकडून 500 कोटींची मदत, 50 लाख लोकांची जेवणाची व्यवस्था

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.