Jio Glass | मिक्स्ड रिअ‍ॅलिटीचे अनुभव देणारा ‘जियो ग्लास’, इशा-आकाश अंबानी यांचे महत्त्वाकांक्षी प्रॉडक्ट

जियो ग्लास या नवीन मिक्स्ड रिअ‍ॅलिटी हेडसेटमुळे ऑनलाइन व्हिडिओ कॉल अत्यंत सुलभतेने होऊ शकेल, असे इशा अंबानी यांनी सांगितले

Jio Glass | मिक्स्ड रिअ‍ॅलिटीचे अनुभव देणारा 'जियो ग्लास', इशा-आकाश अंबानी यांचे महत्त्वाकांक्षी प्रॉडक्ट
Follow us
| Updated on: Jul 15, 2020 | 5:56 PM

मुंबई : ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ने आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ‘जियो ग्लास’ (Jio Glass) हे महत्त्वाकांक्षी प्रॉडक्ट लाँच केले. ‘जियो ग्लास’ने सामान्य ऑफिस कॉलला एका नाविन्यपूर्ण स्तरावर नेले आहे. रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे पुत्र आकाश आणि इशा अंबानी यांनी ही योजना जाहीर केली. (Isha Ambani Akash Ambani launches Jio Glass Mixed Reality technology)

जियो ग्लास या नवीन मिक्स्ड रिअ‍ॅलिटी हेडसेटमुळे ऑनलाइन व्हिडिओ कॉल अत्यंत सुलभतेने होऊ शकेल. या नवीन उत्पादनासह कंपन्या स्वत:च्या थ्रीडी आकृतीसह होलोग्राफिक व्हिडिओ कॉल करु शकतात आणि त्याच वेळी एखादे सादरीकरणही (प्रेझेंटेशन) करु शकतात.

“जियो ग्लास ही आपणास एक विस्मयकारक अनुभव देण्यासाठी मिक्स्ड रिअ‍ॅलिटीतील उत्कृष्ट श्रेणी प्रदान करते. कुठल्याही बाह्य अ‍ॅक्सेसरिजशिवाय स्पेशल आणि पर्सनलाईज्ड ऑडीओ सिस्टम सुरु केली आहे” असे रिलायन्सचे उपाध्यक्ष किरण थॉमस म्हणाले.

जियो ग्लासचे वजन केवळ 75 ग्रॅम आहे. एकाच केबलद्वारे कनेक्ट करता येते. यात आधीपासूनच 25 इनबिल्ट अ‍ॅप्स आहेत. यामध्ये वास्तववादी व्हिडिओ मीटिंग्ज करता येतील.

हेही वाचा : Jio चा धमाका, पुढील वर्षी आत्मनिर्भर 5G, तर गुगलची 33 हजार कोटीची गुंतवणूक

जियो ग्लासमुळे शिक्षक आणि विद्यार्थी 3डी व्हर्च्युअल रुममध्ये एकत्र येऊ शकतात. रिअल टाईममध्ये जियो मिक्स्ड रिअ‍ॅलिटी क्लाऊडमध्ये होलोग्राफिक वर्ग आयोजित करता येतील.

किराणा दुकान यापुढे मर्यादित उत्पादन श्रेणी, जागा किंवा वितरण आव्हानांद्वारे मागे राहणार नाहीत. JioMart सोबत भागीदारीमुळे किराणा स्टोअर्सना व्यवसाय आणि उत्पन्न वाढवण्यात मदत होईल, असे इशा अंबानी म्हणाल्या.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचं (RIL) पहिली व्हर्चुअल आणि 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यामध्ये रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला.

रिलायन्सच्या सभेतील मुख्य मुद्दे

1. Google ची 7.7% स्टेकसाठी जिओमध्ये 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक 2. रिलायन्स कर्जमुक्त होण्याच्या ध्येयाच्याही पुढे 3. रिलायन्सची 2000 कोटीपेक्षा अधिकची निर्यात, जिओ 69 हजार 372 सर्वाधिक जीएसटी देणारी कंपनी 4. 5 मिलियन यूजरने जिओ मीट अॅप डाऊनलोड केलं 5. जियोचं संपूर्ण स्वदेशी 5G नेटवर्क पुढच्या वर्षी कार्यरत होणार 6. जियो ग्लास या व्हर्चूअल रिअलिटी गॉगलचं अनावरण. फक्त 75 ग्रॅम वजन. सध्या 25 अॅप उपलब्ध. ऑगमेंटेड रिअलिटी व्हिडीओची सोय. 7. जियो मार्टच्या माध्यमातून किराणा दुकानांशी भागिदारी 8. जियो मीटच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण क्षेत्रात वाढती सक्रियता 9. 150 अब्ज डॉलर्सचं बाजार भांडवल असलेली रिलायन्स पहिली भारतीय कंपनी

(Isha Ambani Akash Ambani launches Jio Glass Mixed Reality technology)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.