आता प्रत्येक ट्रांजॅक्शनवर कॅशबॅक, Paytm चं क्रेडिट कार्ड लाँच

पेटीएम या ई-कॉमर्स कंपनीने स्वतःचं क्रेडिट कार्ड लाँच केलं आहे. कंपनीने दावा केला आहे की, या क्रेडिट कार्डद्वारे शॉपिंग केल्यास प्रत्येक ट्रांजॅक्शनवर कॅशबॅक ऑफर मिळणार आहे.

आता प्रत्येक ट्रांजॅक्शनवर कॅशबॅक, Paytm चं क्रेडिट कार्ड लाँच
Follow us
| Updated on: Oct 19, 2020 | 4:49 PM

मुंबई : पेटीएम (Paytm) या ई-कॉमर्स कंपनीने स्वतःचं क्रेडिट कार्ड लाँच केलं आहे. यावेळी कंपनीने दावा केला आहे की, या क्रेडिट कार्डद्वारे शॉपिंग केल्यास प्रत्येक ट्रांजॅक्शनवर कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. कंपनीने म्हटलं आहे की, आम्ही नेक्स्ट जनरेशन क्रेडिट कार्ड लाँच करत आहोत. पुढील 12 ते 18 महिन्यांमध्ये तब्बल 20 लाख कार्ड जारी करणे हे कंपनीचे मुख्य उद्दीष्ट आहे. (Paytm Introducing Next-Generation Credit Cards for the Masses with cashback offers)

क्रेडिट कार्डसाठी वेगवेगळे कार्ड इश्यू करणाऱ्या (उदा. गिफ्ट कार्ड) ब्रॅण्ड्ससोबत पेटीएम भागिदारी करणार आहे. याद्वारे विविध को-ब्रॅण्ड्स जारी केले जाणार आहेत. या क्रेडिट कार्डसोबत वेगवेगळे खास फिचर्स दिले जाणार आहेत. त्यासोबतच ग्राहकांना स्पेंडिंग टिप्स (खर्च करण्यासाठीचे सल्ले) दिल्या जाणार आहेत. हे क्रेडिट कार्ड अॅपद्वारे मॅनेज केलं जाऊ शकतं.

Paytm Credit Card चा पासवर्ड अॅपद्वारे बदलता येईल. गरज पडल्यास कार्ड ब्लॉक करता येईल, तसेच पत्ता अपडेट करता येईल. कंपनीने म्हटलं आहे की, प्रत्येक ग्राहकाला हे क्रेडिट कार्ड रियल टाईममध्ये मॅनेज करता येईल. तसेच हे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या कोणत्याही ग्राहकाची फसवणूक झाल्यास ग्राहकाचे नुकसान होऊ नये यासाठी विमा कवच दिले जाणार आहे.

कंपनीकडून दिली जाणारी कॅशबॅक पेटिएम गिफ्ट वाऊचरच्या रुपात मिळेल. हे वाऊचर पेटीएम इकोसिस्टिममध्ये वापरता येईल. Paytm Credit Card इश्यू करण्यासाठी कंपनी ग्राहकांचा क्रेडिट स्कोर आणि पेटीएम ट्रांजॅक्शन हिस्ट्री/परचेज पैटर्नचा आधार घेणार आहे.

Paytm Credit Card अॅप्लिकेशनची प्रोसेसदेखील डिजिटल असेल. पेटीएम अॅपवर कार्डसाठी एक डेडिकेटेड सेक्शन असेल. याद्वारे प्रत्येक युजर्स त्याचं कार्ड मॅनेज करु शकतो.

संबंधित बातम्या

Flipkart Big Billion Days Sale: ‘या’ पाच टीव्हींवर जबरदस्त डिस्काऊंट

जिओचा धमाका, 2500 ते 3000 रुपयात जिओ 5 जी स्मार्टफोन लाँच करणार

Xiaomi ची नवीन टेक्नॉलोजी, आता 19 मिनिटात बॅटरी चार्ज होणार

‘मेड इन इंडिया’चा नारा देत Micromax भारतीय बाजारात पुनरागमन करण्यासाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

(Paytm Introducing Next-Generation Credit Cards for the Masses with cashback offers)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.