TikTok | …म्हणून टिकटॉकने हटवले 3.7 कोटी भारतीयांचे व्हिडीओ!

न्यूडीटी आणि लैंगिकतेला प्रोत्साहन दिल्या कारणाने 22.3%, तर सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 19.6% व्हिडीओ हटवले गेले आहेत.

TikTok | ...म्हणून टिकटॉकने हटवले 3.7 कोटी भारतीयांचे व्हिडीओ!
Follow us
| Updated on: Sep 23, 2020 | 7:49 PM

बीजिंग : चिनी अ‍ॅप ‘टिकटॉक’ने कम्युनिटी गाईडलाईन्सचे नियम मोडणाऱ्या व्हिडीओंना मागच्या सहा महिन्यांपासून हटवण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत सुमारे 10.4 कोटी व्हिडीओ डिलीट करण्यात आले आहेत. यात 3.7 कोटी भारतीय व्हिडीओंचा समावेश होता. 98 लाख व्हिडीओ डिलीट झाल्याने भारतानंतर दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. भारतापाठोपाठ अमेरिकेनेही टिकटॉकवर बंदी घातली आहे. आता ओरॅकल-वॉलमार्ट ‘टिकटॉक’ विकत घेणार असल्याची शक्यता वर्वण्यात येत आहे. (Tiktok videos community guidelines)

बंदी येण्यापूर्वी भारतात टिकटॉकचे 20 कोटी वापरकर्ते होते. भारत आणि अमेरिका यांच्या व्यतिरिक्त पाकिस्तानचे 64 लाख, ब्राझीलचे 55 लाख, तर ब्रिटनचे 29 लाख व्हिडीओ टिकटॉकने डिलीट केले आहेत.

जेडीनेटच्या अहवालानुसार, वापरकर्त्यांनी रिपोर्ट करण्यापूर्वीच एकूण व्हिडीओंपैकी 96.3% व्हिडीओ डिलीट करण्यात आले होते. तर यातील 90.3% व्हिडीओंना वापरकर्त्यांनी नंतर रिपोर्ट केले. न्यूडीटी आणि लैंगिकतेला प्रोत्साहन दिल्या कारणाने 22.3%, तर सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 19.6% व्हिडीओ हटवले गेले आहेत. हे व्हिडीओ हटवण्यासाठी सरकार, कायदा अंमलबजावणी संस्था तसेच आयपी हक्क धारकांकडून कायदेशीर विनंती करण्यात आली असल्याचे टिकटॉककडून सांगण्यात आले आहे.

जून महिन्यात चीन-भारत सीमेवर झालेल्या संघर्षानंतर भारत सरकारने टिकटॉक, व्हीचॅट, यूसी ब्राऊझरसहित 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी आणली होती. भारताच्या सार्वभौमत्व आणि एकात्मतेला धोका पोहोचवू शकतील किंवा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरण्याची शक्यता असलेली ही 59 अ‍ॅप्स वापरण्यावर भारत सरकारने बंदी घातली होती. (Tiktok videos community guidelines)

देशाच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69 अ च्या अंतर्गत ही बंदी घातली आहे. चीनकडून सायबर अटॅकची भीती गेले काही दिवस व्यक्त करण्यात येत होती. त्यावर उपाय म्हणून या चिनी अ‍ॅप्सवर बंधनं नव्हे तर बंदीच घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. देशवासियांची सायबर स्पेस सुरक्षित राहावी, यासाठी हा निर्णय घेत असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते.

संबंधित बातम्या :

Chinese Apps | निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी अंमलबजावणी, Tik Tok, Helo सह 59 चिनी अ‍ॅप अखेर बंद

TikTok App: टिकटॉकच्या अजब गोष्टी, एक फेल अ‍ॅप यूट्यूबचा प्रेक्षक खेचणारं एकमेव अ‍ॅप कसं झालं?

(Tiktok videos community guidelines)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.