घरात पुरेशा प्रकाशासाठी खरेदी करा हे टॉप 5 स्मार्ट बल्ब, किंमतही कमी

स्‍मार्ट लाइट बल्‍ब हे नववर्षामध्‍ये स्‍मार्ट होमच्या दिशेने प्रवास सुरू करण्‍यासाठी परिपूर्ण आणि सर्वात किफायतशीर मार्ग असू शकतो. हे स्‍मार्ट लाइट बल्‍ब वापरण्यास सुलभ असतात.

घरात पुरेशा प्रकाशासाठी खरेदी करा हे टॉप 5 स्मार्ट बल्ब, किंमतही कमी
Smart Bulbs
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 11:45 AM

मुंबई : नववर्ष आजपासून सुरु झालं आहे. म्‍हणून आम्‍ही तुमच्‍या घराला प्रकाशासह सुशोभित करण्‍यासाठी सर्वोत्तम स्‍मार्ट लाइट्सची यादी तयार केली आहे. सजावटीबाबत बोलायचे झाले तर सामान्‍यत: घराला सजावटीच्‍या मेणबत्त्या, स्ट्रिंग बल्‍ब्‍स अशा वस्‍तूसह सजवले जाते. पण उपलब्‍ध बहुतांश लायटिंग अॅक्‍सेसरीज जवळपास समानच आहेत. स्‍मार्ट लाइट बल्‍ब हे नववर्षामध्‍ये स्‍मार्ट होमच्या दिशेने प्रवास सुरू करण्‍यासाठी परिपूर्ण आणि सर्वात किफायतशीर मार्ग असू शकतो. हे स्‍मार्ट लाइट बल्‍ब वापरण्यास सुलभ असतात. घरामध्‍ये रोषणाई करत नववर्ष स्‍वागताचा आनंद साजरा करण्‍यासारखा दुसरा सर्वोत्तम मार्ग कोणता असेल? तुमच्‍या घरासाठी खरेदी करता येऊ शकतील असे स्मार्टबल्बचे काही पर्याय पुढीलप्रमाणे आहेत. (5 top clas Smart Bulbs for Home in affordable price)

1. सूर्या डॅझल एलईडी स्‍मार्ट डाऊनलाइटर : सूर्या डॅझल स्‍मार्ट डाऊनलाइटर घराला आनंददायी अनुभवासह सजावटीचे फील देते. या पर्यावरणास-अनुकूल लाइट्स उपयुक्‍त रिमोटच्‍या माध्‍यमातून नियंत्रित करता येऊ शकतात आणि अडथळायुक्त वाय-फाय कनेक्‍शन, ब्‍ल्‍यूटूथ कनेक्टिव्‍हीटी व डेटा चोरी यांसारख्‍या दैनंदिन समस्‍यांवर सुलभ सोल्‍यूशन आहेत. या लाइट्स 3 वॅट ते 22 वॅटपर्यंतच्‍या पॉवर रेंजमध्‍ये उपलब्‍ध आहेत.

2. विप्रो 9 वॅट स्‍मार्ट एलईडी बल्‍ब

तुमचं बजेट 700 रूपयांपेक्षा कमी असेल तर विप्रो स्‍मार्ट एलईडी बल्‍ब तुमच्‍यासाठी अगदी योग्‍य पर्याय आहे. तुम्‍ही विप्रो नेक्‍स्‍ट स्‍मार्ट अॅपचा वापर करत कुठूनही घरातील वाय-फाय एलईडी लाइट बल्‍बवर नियंत्रण ठेवू शकता. तुम्‍ही या नवीन वाय-फाय इनेबल स्‍मार्ट बल्‍बमधून जवळपास 16 मिलियन रंगसंगतींचा (आरजीबी) अनुभव घेऊ शकता. या विप्रो वाय-फाय इनेबल स्‍मार्ट एलईडी बल्‍ब बी 22 9-वॅटची खासियत म्‍हणजे तुम्‍ही आवाजासह बल्‍बवर नियंत्रण ठेवू शकता.

3. हॅलोनिक्‍स 12 वॅट स्‍मार्ट एलईडी बल्‍ब

हॅलोनिक्‍स वाय-फाय एनेबल स्‍मार्ट बल्‍ब भारतातील उत्तराखंड येथील हॅलोनिक्‍स हरिद्वार प्‍लाण्‍ट येथे निर्माण करण्‍यात आला आहे. हा एलईडी लाइट बल्‍ब बाजारपेठेतील इतर कोणत्‍याही वाय-फाय बल्‍ब्‍सप्रमाणे कार्य करतो आणि अॅमेझॉन इको व गुगल असिस्‍टण्‍टसह साऊंड कंट्रोल करण्‍यासोबत कार्य करतो.

4. एमआय 10 स्‍मार्ट बल्‍ब

हा एमआय एलईडी वाय-फाय लाइट बल्‍ब अॅमेझॉनवर दीर्घकाळापर्यंत टिकाऊपणाची खात्री देतो. हा एलईडी लाइट बल्‍ब एमआयचा नवीन व सर्वोत्तम बल्‍ब आहे. या बल्‍बची डिझाइन उत्तम आहे आणि हा एमआयने निर्माण केलेला सर्वात लक्षवेधक मॉडेल आहे. कोणत्‍याही प्रकारचे वाय-फाय एकीकृत एलईडी लाइट बल्‍ब असोत, तुम्‍ही नेहमीच उत्तम दर्जा असलेल्‍या बल्‍बची निवड किंवा खरेदी करता. हा एलईडी लाइट बल्‍ब तुमच्‍या घरासाठी उत्तम गुंतवणूक आहे आणि 11 वर्षांपर्यंत टिकतो, असा दावा कंपनीने केला आहे.

5. फिलिप्‍स स्‍मार्ट बल्‍ब

फिलिप्‍स ह्यू स्‍मार्ट लाइट स्‍टार्टर किट सर्व लाइटिंग गरजांची पूर्तता करण्‍याची इच्‍छा असल्‍यास तुमच्‍या घरासाठी अगदी योग्‍य पर्याय आहे. या स्‍टार्टर पॅकचा सर्वात मोठा फायदा म्‍हणजे यामध्‍ये 3 ह्यू जनरेशन 2.0 व्‍हाइट अॅम्बियन्‍स, कलर अॅम्बियन्‍स 10 वॅट ई 27 एलईडी बल्‍ब्‍स आणि 1 ह्यू जनरेशन 2.0 ब्रिज आहे. तुम्‍ही घरामध्‍ये आकर्षक लाइटिंग निर्माण करण्‍यासाठी फिलिप्‍स ह्यू अॅपवरील प्री-सेट लाइट सेटिंग्ग्जमधून निवड करू शकता.

इतर बातम्या

Vodafone Idea चे Disney+ Hotstar बेनिफिटवाले प्रीपेड रिचार्ज प्लॅन बंद, जाणून घ्या डिटेल्स

सर्वात जलद चार्ज होणाऱ्या Xiaomi 11i HyperCharge ची लाँच डेट जाहीर, किंमत…

फ्लॅगशिप प्रोसेसर, 60MP कॅमेरासह Moto चा शानदार स्मार्टफोन भारतात लाँचिंगसाठी सज्ज

(5 top clas Smart Bulbs for Home in affordable price)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.