भारतात 52 लाखाची दुकाटी बाईक लाँच
मुंबई : इटलीतील प्रसिध्द ब्रँड ‘दुकाटी’ने ‘पॅनिगेल V4R’ सुपरबाईक भारतात लाँच केली आहे. ही बाईक सगळ्यात महागडी असल्याचे सांगितलं जात आहे. ‘पॅनिगेल V4R’ ची किंमत तब्बल 52 लाख रुपये आहे. अशी दमदार बाईक भारतात लाँच झाल्याने बाईकप्रेमींमध्ये या बाईकबद्दल उत्सुकता आहे. भारतामध्ये सुरुवातीला केवळ 5 युनिटद्वारे बाईकची विक्री करण्यात येणार आहे. लवकरच पॅनिगेल V4R बाईक बाजारात उपलब्ध होणार आहे. मात्र त्या आधीच कंपनीकडून दुकाटीच्या सर्व डीलर्सना बुकींग सुरु […]
मुंबई : इटलीतील प्रसिध्द ब्रँड ‘दुकाटी’ने ‘पॅनिगेल V4R’ सुपरबाईक भारतात लाँच केली आहे. ही बाईक सगळ्यात महागडी असल्याचे सांगितलं जात आहे. ‘पॅनिगेल V4R’ ची किंमत तब्बल 52 लाख रुपये आहे. अशी दमदार बाईक भारतात लाँच झाल्याने बाईकप्रेमींमध्ये या बाईकबद्दल उत्सुकता आहे.
भारतामध्ये सुरुवातीला केवळ 5 युनिटद्वारे बाईकची विक्री करण्यात येणार आहे. लवकरच पॅनिगेल V4R बाईक बाजारात उपलब्ध होणार आहे. मात्र त्या आधीच कंपनीकडून दुकाटीच्या सर्व डीलर्सना बुकींग सुरु करण्यास सांगितलं आहे. दुकाटीच्या नवीन बाईकचा लूक सर्वांन आकर्षित करुन घेत आहे.
जे ग्राहक 30 नोव्हेंबपूर्वी बाईक बुकिंग करतील, त्यांना 2019च्या पहिल्या तीन महिन्यांत बाईक वितरीत होईल आणि 30 नोव्हेंबरनंतर बाईक बुकिंग केल्यास 2019 च्या एप्रिल ते जूनमध्ये बाईक वितरीत केली जाईल अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली.
या नव्या बाईकमध्ये दुकाटीने गाडीचे वजन कमी ठेवले आहे. बाईकसाठी प्रत्येक पार्ट कमी वजनाचे वापरल्यामुळे स्टँडर्ड मॉडेलमध्ये 2 kg वजन कमी आहे. V4 R चे वजन 172 Kg आहे. तसेच मोठी एअर इनटेक कार्यक्षमताही दिली आहे. दुकाटी पॅनिगेल V4R मध्ये Akrapovic रेस एग्जॉस्ट सिस्टमचा ऑप्शनही दिला आहे.
दमदार इंजिन
WSBK (World Superbike Championship) बाईक V4R मध्ये 998 cc Desmosedici Stradale R चे इंजिन दिलं आहे. जे स्टॅंडर्ड V4 मध्ये लागलेल्या 1103 cc मोटारपेक्षा छोटे आहे. इंजिनाची क्षमता 221 bhp इतकी आहे. याशिवाय यामध्ये विशेष Akrapovic racing exhaust kit ही लावण्यात आला आहे. या किटमुळे गाडी सुसाट धावू शकते.
भारतात पॅनिगेल V4ला मिळालेल्या शानदार प्रतिसादानंतर आम्हाला पूर्ण विश्वास होता की, पॅनिगेलची V4 R बाईक लोकांना चांगली पसंतीस पडेल. पॅनिगेल V4 R आणि दुकाटीच्या DNA आणि पॅनिगेल V4 Sच्या कॉम्बीनेशनमधून तयार करण्यात आली आहे. पॅनिगेल V4R बाईक भारताच्या ऑटो इंडस्ट्रीमध्ये आपले नवे स्थान निर्माण करेल असा विश्वास यावेळी दुकाटी इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर सर्गी कौनोवास यांनी सांगितले.