5G Update: प्रतीक्षा संपली, नवीन वर्षात 13 शहरांमध्ये सुरु होणार सेवा, टेस्टिंग अंतिम टप्प्यात

आगामी वर्षात देशातील 13 शहरांमध्ये 5G टेलिकॉम सेवा सुरु होत आहे. टेलिकॉम विभागाकडून फंडेड स्वदेशी 5G टेस्टिंग अंतिम टप्प्यात आहे. 31 डिसेंबर 2021 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होण्याचा अंदाज आहे.

5G Update: प्रतीक्षा संपली, नवीन वर्षात 13 शहरांमध्ये सुरु होणार सेवा, टेस्टिंग अंतिम टप्प्यात
5G Technology
Follow us
| Updated on: Dec 28, 2021 | 11:37 AM

नवी दिल्ली : सुसाट वेगाने इंटरनेटचा वापर करु इच्छिणाऱ्या तरुणाईसाठी मोठी बातमी आहे. देशात मोठी डिजिटल क्रांती घडवण्यासाठी 2022 हे वर्ष जणू सज्ज आहे, असेच म्हणावे लागेल. दूरसंचार विभागातर्फे सुरु असलेली स्वदेशी 5G परीक्षण योजना आता अंतिम टप्प्यात असून पुढील वर्षात देशातील मोठ्या शहरांमध्ये ही सेवा सुरु केली जाईल. 31 डिसेंबर 2021 पर्यंत ही चाचणी प्रक्रिया सुरु होणार असून विभागातील अधिकाऱ्यांनी यासंबंधीचे सूतोवाच केले. एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन आयडियासह दूरसंचार ऑपरेटर्सनी गुरुग्राम, बंगळुरू, कोलकता, मुंबई, चंदीगड, दिल्ली, जामनगर, अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद, लखनौ, पुणे आणि गांधीनगरात 5जी परीक्षण केंद्र स्थापन केले आहेत. या महानगरांमध्ये आणि देशातील काही मोठ्या शहरांमध्ये पुढील वर्षी 5G सेवा सुरु होतील. (5G Technology trial will end on December 31, service will be piloted in 13 cities across the country)

दूरसंचार विभागाने 2021 मधील या प्रक्रियेत कोणते टप्पे पार केले, याविषयी माहिती दिली. भारतात इंटरनेटपासून नक्षल प्रभावित क्षेत्रांमध्ये मोबाइल टॉवर्सच्या स्थापनेसह दूरसंचार क्षेत्रात आर्थिक ताण दूर करण्यापर्यंत सप्टेंबर महिन्यात विविध सुधारणांची घोषणा झाली. या अत्यंत महत्त्वाच्या घटना आहेत. विशेष म्हणजे, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2014 ते 2021 दरम्यान दूरसंचार क्षेत्रातील प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक 1,55,353 कोटी रुपयांवर पोहोचली. 2002 ते 2014 या काळात ती 62,386 कोटी रुपये होती. तसेच दूरसंचार विभागाचे फंडिंग असलेली 5G परीक्षण योजना अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले आहे.

5G टेस्टिंगबाबत IIT कॉलेजचे मोठे योगदान

5G लागू करणाऱ्या आठ मोठ्या एजन्सीजमध्ये आयआयटी मुंबई, आयआटी दिल्ली, आयआयटी हैदराबाद, आयआयटी मद्रास, आयआयटी कानपूर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर, सोसायटी फॉर अप्लॉइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च आणि सेंटर फॉर एक्सलेन्स इन वायरलेस टेक्नोलॉजी या मागील 36 महिन्यांपासून काम करत आहेत.

224 कोटी रुपयांचा प्रकल्प

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 5G टेक्नोलॉजी लागू करण्यासंबंधी प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून 31 डिसेंबर 2021 पर्यंत ती पूर्ण होऊ शकते. या योजनेसाठी सुमारे 224 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तसेच याद्वारे देशातील 5G डिव्हाइस आणि नेटवर्क डिव्हाइसच्या परीक्षणाचा मार्गही मोकळा होईल.

…तर मोबाइलचे जगच बदलून जाणार

5G आल्यानंतर स्मार्ट फोनचे जगच पूर्णपणे बदलेल. एका अंदाजानुसार, 5G ची स्पीड 4G पेक्षा 10 पटींनी जास्त आहे. 5G सेवेची सुरुवात झाल्यानंतर एक नवी डिजिटल क्रांती घडेल. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल. ई-गव्हर्नन्सचा विस्तार होईल. कोरोना संकटात तर देशातील बहुतांश व्यवस्था इंटरनेटवर अवलंबून होती. त्यामुळे 5G सेवा आल्यानंतर या सेवा आणखी सुरळीत होतील.

इतर बातम्या

Airtel Vs JioFiber Vs BSNL: 50Mbps स्पीडसह 500 रुपयांपेक्षा स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन, जाणून घ्या बेस्ट ऑप्शन्स

Smartphones : रंग बदलणारा मोबाइल पाहिलाय? वाचा, कधी येणार आणि काय फिचर्स आहेत

Simless Phone : Appleचा नवा iPhone विशेष तंत्रज्ञानानं सज्ज! सिमकार्डशिवाय मोबाइलवर बोलता येणार..!

(5G Technology trial will end on December 31, service will be piloted in 13 cities across the country)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.