मुंबई-पुणेकरांना पुढील वर्षी 5G सेवा मिळणार, टेस्टिंग अंतिम टप्प्यात, 4G पेक्षा 10 पट अधिक इंटरनेट स्पीड

भारतात, 4G नेटवर्कमुळे प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रदेशात अनेक वेगवेगळे बदल पाहिले आहेत. 4G मुळे मोबाईलवरुन अनेक कामं होऊ लागली आहेत. पण 4G नंतर आता लोक 5G ची आतुरतेने वाट पाहात आहेत.

मुंबई-पुणेकरांना पुढील वर्षी 5G सेवा मिळणार, टेस्टिंग अंतिम टप्प्यात, 4G पेक्षा 10 पट अधिक इंटरनेट स्पीड
5G Network
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 6:30 AM

मुंबई : भारतात, 4G नेटवर्कमुळे प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रदेशात अनेक वेगवेगळे बदल पाहिले आहेत. 4G मुळे मोबाईलवरुन अनेक कामं होऊ लागली आहेत. पण 4G नंतर आता लोक 5G ची आतुरतेने वाट पाहात आहेत. 5G (5G नेटवर्क) च्या प्रवेशाने खरी डिजिटल क्रांती अपेक्षित आहे. पण ज्या बातमीची लोक इतके दिवस वाट पाहत होते ती बातमी नुकतीच समोर आली आहे. (5G Trial in India : 13 cities including Mumbai, Pune will be first to receive 5G services next year)

गुरुग्राम, बंगळुरु, कोलकाता, मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे ही प्रमुख शहरे पुढील वर्षी 5G सेवा मिळवणारी पहिली शहरे असतील, असे दूरसंचार विभागाने (DoT) सोमवारी अधिकृत निवेदनात म्हटले आहे. मार्च-एप्रिल 2022 मध्ये 5G साठी स्पेक्ट्रम लिलाव आयोजित करण्याची सरकारची योजना आहे.

या वर्षी सप्टेंबरमध्ये, दूरसंचार नियामक TRAI कडून स्पेक्ट्रमच्या लिलावासाठी, प्रामुख्याने राखीव किंमत, बँड योजना, ब्लॉक आकार, स्पेक्ट्रमचे प्रमाण इत्यादींवर दूरसंचार नियामक TRAI कडून शिफारसी मागवण्यात आल्या होत्या. ट्रॉयने या विषयावर उद्योगातील स्टेकहोल्डर्सशी काउन्सलिंग सुरू केले आहे.

5G टेस्टिंग कुठे आणि कशी केली जाईल

गेल्या दोन वर्षांपासून भारतात 5G ची टेस्टिंग सुरू आहे आणि मे 2022 पर्यंत देशात 5G च्या चाचण्या सुरु राहतील. संपूर्ण देश 5G च्या कमर्शियल लॉन्चिंगची वाट पाहात आहे, परंतु अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. आता Jio, Airtel आणि Vodafone-Idea या टेलिकॉम कंपन्या विविध शहरांमध्ये 5G नेटवर्कचं टेस्टिंग करत आहेत, जिथे 5G सेवा पहिल्यांदाच जाहीर करण्यात आल्या आहेत.

टेलीकॉम ऑपरेटर Bharti Airtel, Reliance Jio आणि Vodafone Idea यांनी गुरुग्राम, बंगळुरू, कोलकाता, मुंबई, चंदीगड, दिल्ली, जामनगर, अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद, लखनौ, पुणे आणि गांधीनगर येथे 5G टेस्ट साइट्स उभारल्या आहेत.

भारतात 5G स्पीड सर्वोत्तम असेल

देशात 5G आल्यानंतर मोबाईल फोनचे जग बदलून जाईल. एका अंदाजानुसार, 5G चा वेग 4G पेक्षा 10 पट जास्त आहे. 5G सेवेचं इंट्रोडक्शन देशात डिजिटल क्रांतीला नवा आयाम देईल. याचा फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला होईल. ई-गव्हर्नन्सचा विस्तार होईल. कोरोनाच्या काळात ज्या प्रकारे प्रत्येकजण इंटरनेटवर अवलंबून होता. हे लक्षात घेता, 5G च्या आगमनामुळे प्रत्येकाचे जीवन अधिक सोपे होण्यास मदत होईल.

काय आहे 5G?

5 जी म्हणजे मोबाइल नेटवर्कची 5 वी पिढी (5th Generation). वेगवान नेटवर्क स्पीड, अखंडित एचडी सर्फिंग, उत्कृष्ट सेवा आणि बरेच काही. भारत सरकारने 5G चाचणीला परवानगी दिली असून लवकरच टेलिकॉम कंपन्यांना स्पेक्ट्रम उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. एअरटेलनेही 5 जी नेटवर्कची चाचणी केली आहे.

वास्तविक, 5 जी तंत्रज्ञान ही सेल्युलर सेवेतील लेटेस्ट टेक्नोलॉजी आहे. याला 4 जी नेटवर्कची पुढील आवृत्ती म्हटले जाऊ शकते. यात वापरकर्त्यांना अधिक नेट स्पीड, कमी लेटेंसी आणि अधिक फ्लेक्सिबिलिटी पहायला मिळेल. आतापर्यंत सेल्युलर तंत्रज्ञान कनेक्टिव्हिटीवर लक्ष केंद्रित करत असे, परंतु 5 जी सेल्युलर तंत्रज्ञान एक पाऊल पुढे जाईल आणि क्लायंटला थेट क्लाउडशी कनेक्ट करेल.

इतर बातम्या

Airtel Vs JioFiber Vs BSNL: 50Mbps स्पीडसह 500 रुपयांपेक्षा स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन, जाणून घ्या बेस्ट ऑप्शन्स

Smartphones : रंग बदलणारा मोबाइल पाहिलाय? वाचा, कधी येणार आणि काय फिचर्स आहेत

Simless Phone : Appleचा नवा iPhone विशेष तंत्रज्ञानानं सज्ज! सिमकार्डशिवाय मोबाइलवर बोलता येणार..!

(5G Trial in India : 13 cities including Mumbai, Pune will be first to receive 5G services next year)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.