5G Network टेस्टिंग सुरु, मोबाईल कंपन्या 15000 हून कमी किंमतीत 5G स्मार्टफोन्स लाँच करणार

दूरसंचार विभाग आणि भारत सरकारने टेलिकॉम सर्व्हिस प्रदात्यांना भारतात 5G नेटवर्कच्या चाचण्यांसाठी (5G Trials) परवानगी दिली आहे.

5G Network टेस्टिंग सुरु, मोबाईल कंपन्या 15000 हून कमी किंमतीत 5G स्मार्टफोन्स लाँच करणार
Upcoming 5g Phone
Follow us
| Updated on: May 06, 2021 | 9:43 PM

नवी दिल्ली : दूरसंचार विभाग (Department of Telecommunications) आणि भारत सरकारने टेलिकॉम सर्व्हिस प्रदात्यांना 5G चाचण्यांसाठी (5G Trials) परवानगी दिली आहे. ही परवानगी मिळालेल्या ऑपरेटर्समध्ये भारती एअरटेल, रिलायन्स, जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि एमटीएनएलचा समावेश आहे. या दूरसंचार सेवा प्रदात्यांनी (टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्स) ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स आणि तंत्रज्ञान प्रदात्यांसह (टेक्नोलॉजी प्रोव्हायडर्स) म्हणजेच एरिक्सन, नोकिया, सॅमसंग आणि C-DOT बरोबर भागीदारी केली आहे. त्याच वेळी, रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड त्यांनी स्वत: विकसित केलेल्या तंत्रज्ञानाद्वारे ट्रायल्सची चाचणी करणार आहे. दरम्यान, देशात 5G Network साठी टेस्टिंग सुरु झाल्यामुळे आता मोबाईल कंपन्या 15000 हून कमी किंमतीत 5G स्मार्टफोन्स लाँच करण्याचा सपाटा लावणार असल्याचे दिसून येत आहे. अनेक कंपन्यांनी किफायतशीर दरात 5G स्मार्टफोन्स तयार करण्यास सुरुवात केली आहे. (5G trials Started in India smartphone companies launching cheapest 5G phones in india)

Xiaomi Redmi Note 9 5G

या फोनची किंमत 14,590 रुपये इतकी असू शकते. कंपनी लवकरच हा स्मार्टफोन भारतात लाँच करण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये ऑक्टा कोर 2.4 Ghz क्वाड मीडियाटेक डायमेंसिटी 800 प्रोसेसर दिला जाईल. हा फोन 6 जीबी रॅमसह येईल. यामध्ये 6.53 इंचांची IPS LCD स्क्रीन दिली जाईल. कॅमेऱ्याच्या बाबतीत यामध्ये 48 मेगापिक्सल, 8 मेगापिक्सल, 2 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला जाईल. फोनमध्ये 13 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा दिला जाणयाची शक्यता आहे. तसेच यात 5000mAh क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते, जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Xiaomi Redmi Note 10 5G

या फोनची किंमत 14,590 रुपये असू शकते. यामध्ये 6.5 इंचांची IPS LCD स्क्रीन दिली जाईल. ज्याचा 90Hz रिफ्रेश रेट असेल. फोनमध्ये ऑक्टा कोर 2.2GHz क्वाड मीडियाटेक डायमेंसिटी 700 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. जो 4 जीबी रॅमसह येईल. यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा 2MP आणि 2MP ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाईल. फोन डुअल कलर एलईडी फ्लॅशसह येईल. फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाईल. फोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते. फोन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. यामध्ये यूएसबी टाइप सी पोर्ट दिला जाईल.

Realme Q2

या फोनची किंमत 14,290 रुपये असेल. फोनमध्ये ऑक्टा कोअर 2.4Ghz क्वाड मीडियाटेक डायमेन्शन 800 प्रोसेसर असेल. हा 4 जीबी रॅमसह येईल. फोनमध्ये 6.5 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले असेल जो 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येईल. फोनचा कॅमेरा 48 मेगापिक्सल, 8 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा असेल आणि तो एलईडी फ्लॅशसह येईल. फोनमध्ये 120Hz चा रिफ्रेश रेट दिला जाईल. फोनची बॅटरी 5000mAh ची असेल जी फास्ट चार्जिंग आणि यूएसबी टाइप सी पोर्टला सपोर्ट करेल.

Oppo A53 5G

फोनची किंमत 14.990 रुपये इतकी असेल. यात तुम्हाला ऑक्टा कोअर 2GHz क्वाड कोअर मीडियाटेक डायमेन्शन 720 प्रोसेसर मिळेल. हा फोन 4 जीबी रॅमसह येईल. फोनचा डिस्प्ले 6.5 इंचाचा असेल जो आयपीएस एलसीडी असेल. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह येईल. फोनची बॅटरी 4040mAh क्षमतेची असेल आणि ती फास्ट चार्जिंग आणि यूएसबी टाइप सी पोर्टसह येईल.

संबंधित बातम्या

तीन महिन्यात भारतात 5G नेटवर्क सुरु होणार? 10 लाख नोकऱ्या मिळणार

काय आहे 5G? तुम्हाला किती स्पीड मिळेल?

(5G trials Started in India smartphone companies launching cheapest 5G phones in india)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.