Poco X4 Pro 5G First Sale : 64MP कॅमेरा, 5000 mAh बॅटरीसह बजेट फोन बाजारात, थोड्याच वेळा सेल सुरू
पोकोच्या लेटेस्ट 5 जी फोनचा पहिला सेल आजपासून सुरु झाला आहे. 64MP Camera, 5000 mAh बॅटरीसह ग्राहकांसाठी अगदी बजेटमधील स्मार्टफोन flipkart वर उपलब्ध आहे. जाणून घेऊया स्मार्टफोनवर तुम्हाला मिळत असलेल्या ऑफर्सची माहिती
मुंबई : पोकोने (Poco) या चिनी स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने आपला नवा बजेट स्मार्टफोन पोको एक्स 4 प्रो 5जी (Poco X4 Pro 5G ) हा बजेट फोन बाजारात दाखल केला आहे. नवीन लूकसह अत्याधुनिक तंत्रज्ञानासह हा फोन एकदम झक्कास आहे. 64 MP कॅमेरा आणि 5000 mAh बॅटरीसह हा फोन बाजारात दाखल झाला आहे. हा फोन ग्राहकांच्या अगदी बजेटमध्ये आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट (flipkart) या ई-कॉमर्स साईटवर उपलब्ध आहे. या फोनची किंमत 20 हजार रुपये आहे. आजपासून फ्लिपकार्टवर याची विक्री सुरु होत आहे. कंपनीच्या एक्स सिरीजमधील हे लेटेस्ट डिव्हाइस असून, पोको एक्स 3 प्रोचे सक्सेसर म्हणून लाँच करण्यात आला आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह स्क्रीन आणि 67W फास्ट चार्जिंग सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. फोनमध्ये एक ग्लास बॉडी आहे. कंपनीने हा फोन MWC 2022 मध्ये लाँच करण्यात आला होता. मात्र, भारतात हा स्मार्टफोन थोडा बदल करत बाजारात दाखल करण्यात आला आहे. आज दुपारी 12 वाजता flipkart वरुन तुम्ही हा फोन खरेदी करु शकता.
Poco X4 Pro 5G किंमत आणि ऑफर
- पोकोने हा फोन तीन कॉन्फिगरेशनमध्ये लाँच केला आहे.
- स्मार्टफोनचे बेसिक व्हेरियंट म्हणजे 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मॉडेल 18,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
- 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मधील आणखी एका फिचरसह किंमत 19,999 रुपये आहे.
- तर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे.
- हा फोन लेजर ब्लॅक, लेजर ब्लू आणि पोको यलो या रंगांसह सादर करण्यात आला आहे.
स्पेशल ऑफर्स
- फ्लिपकार्टवर दुपारी 12 वाजता या स्मार्टफोनचा सेल सुरु होईल.
- एचडीएफसी बँक कार्ड आणि ईएमआय ट्रान्झॅक्शनवर 1000 रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट मिळेल.
- स्मार्टफोन प्रेमींसाठी ट्रेड-इन सवलतही मिळत आहे.
- ही ऑफर पोको एक्स 2, पोको एक्स 3 आणि एक्स 3 प्रो युजर्ससाठी आहे.
फोनचे स्पेसिफिकेशन्स
- डुअल सिम सपोर्टसह, हा फोन अँड्रॉइड 11 वर आधारित MIUI 13 वर काम करतो.
- यात 6.67 इंचाचा फुल एचडी+ सुपर एमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे.
- 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 360 हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट देण्यात आला आहे.
- डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी गोरिला ग्लास 5 देण्यात आला आहे.
- फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर आहे, जो Adreno 619 GPU सह येतो. यात 8 जीबीपर्यंत रॅम मिळेल.
- या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो, जो 64 एमपी प्रायमरी सेन्सरसह येतो.
- तसेच 8 एमपी अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 एमपीची मॅक्रो लेन्स उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
- यात 128 जीबी पर्यंत स्टोरेजचा पर्याय आहे.
- हँडसेटमध्ये 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
- यात ड्युअल स्टिरिओ स्पीकर्ससह सेफ्टीसाठी साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सरचा पर्यायही उपलब्ध आहे.
इतर बातम्या
150W अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंगसह Realme GT Neo3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास
Apple Down : ॲपलच्या सेवा ठप्प, App Store, Music सह अनेक ॲप्सवर परिणाम
क्वाड कॅमेरा सेटअपसह Samsung चा 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स