Vertical City: सौदी अरबमध्ये पहिल्यांदा तयार होणार ‘उभं शहर’, 170 किमी लांब आणि 90 लाख जणं राहणार

जर सगळे काही योजनेप्रमाणे झाले तर 2025 साली हे शहर बांधून तयार असेल. आपल्या पारंपरिक शहरांच्या रचनांना आणि कल्पनांना यातून छेद मिळणार आहे. लोकसंख्यावाढीचा विचार करता आगामी काळात अशी शहरे जास्त महत्त्वाची आणि पथदर्शी ठरु शकतील.

Vertical City: सौदी अरबमध्ये पहिल्यांदा तयार होणार 'उभं शहर', 170 किमी लांब आणि 90 लाख जणं राहणार
जगातलं उभं शहरImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 4:23 PM

नवी दिल्ली – जगात पहिल्यांदा असं घडणारं आहे, जिथे शहराचा (new city)विस्तार आडवा नाही तर उभा, (vertical)आकाशाच्या दिशेने होणार आहे. या शहराची लांबी 170 किमी असणार आहे. तर रुंदी 200 मीटर असेल. या शहरात एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायला केवळ 20 मिनिटे पुरी होणार आहेत. या ठिकाणी हाय स्पीड ट्रेनही (Speed train)धावणार आहेत. या शहराची उंची 500 मीटर म्हणजे अर्धा किलोमीर असेल. यात घरावरती घरे असणार आहेत. म्हणजे शहराचा विस्तार आडवा न होता उभ्या दिशेने असेल. जर सगळे काही योजनेप्रमाणे झाले तर 2025 साली हे शहर बांधून तयार असेल. आपल्या पारंपरिक शहरांच्या रचनांना आणि कल्पनांना यातून छेद मिळणार आहे. लोकसंख्यावाढीचा विचार करता आगामी काळात अशी शहरे जास्त महत्त्वाची आणि पथदर्शी ठरु शकतील. परग्रहावर तेही चंद्र आणि मंगळावर जाऊन वसाहती उभारण्यापेक्षा, या पृथ्वीतलावर अशी उभी शहरे विकसीत केल्यास आगामी काळात लोकसंख्या आणि पुढच्या पिढीला त्याचा नक्कीच फायदा होईल असा दावा या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी करीत आहेत.

शहराचे नाव असेल द लाईन

या शहराचे नावही ठरवण्यात आले आहे. द लाईन या नावाने हे शहर ओळखण्यात येईल. हे जगातील पहिले व्हर्टिकल शहर असेल. या शहरात ऑफिसेस, घरे, शाळा, उद्यान सगळे काही उभ्या दिशेने असेल. साऊदी अरबचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिल सलमान यांनी या प्रोजेक्टचे संकेत पहिल्यांदा जानेवारी २०२१ मध्ये दिले होते. हे शहर उभे करण्यासाठी ५०० अब्ज डॉलर्स म्हणजे ३९.९५ लाख कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.

काचेने झाकलेले असेल शहर

द लाईन हे शहर काचेच्या अर्धा किलोमीटर उंच भिंतींनी झाकलेले असेल. हे शहर १०० टक्के अपारंपरिक ऊर्जेवर चालेल. सौरऊर्जा, वायूऊर्जेचा वापर करण्यात येईल. या शहरात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही. त्यामुळे कार्बन उत्सर्जनही नसेल. या शहरात १७० किमी अंतरात ९० लाख लोकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

शहराला लागून हायटेक झोन

आपल्या पारंपरिक इमारतींनी पसरलेल्या शहराच्या तुलनेत हे शहर उभ्या दिशेने विस्तारलेले असले. थोडक्यात उभे शहर असेल. या शहरात रस्ते नसतील, कार नसतील, त्यामुळे वायूंचे उत्सर्जन होणार नाही. या शहराजवळ हायटेक झोनही विकसीत करण्यात येणार आहे. याचा एकूण विस्तार २६,५०० वर्ग किलोमीटर इतका असेल. यातून या शहाराला पूर्ण सहयोग देण्यात येईल.

श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.