अ‍ॅपलचा iPhone16 Pro म्हणजे ‘वेस्ट ऑफ टाइम’ , फेसबुकमध्ये उच्च पदावर राहिलेले आदित्य अग्रवाल यांनी असे का म्हटले?

Aditya Agarwal on iPhone: अ‍ॅपलच्या नवीन iPhone 16 Pro मध्ये 6.3-इंचाचा LTPO सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे. जो 120 Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात A18 Pro बायोनिक चिपसेट आहे. 16 Pro मध्ये 48MP मुख्य कॅमेरा, 12MP पेरिस्कोप टेलीफोटो आणि 48MP अल्ट्रावाइड सेन्सर आहे.

अ‍ॅपलचा iPhone16 Pro म्हणजे 'वेस्ट ऑफ टाइम' , फेसबुकमध्ये उच्च पदावर राहिलेले आदित्य अग्रवाल यांनी असे का म्हटले?
Aditya Agarwal on iPhone
Follow us
| Updated on: Oct 06, 2024 | 4:37 PM

सध्या जगभरात अ‍ॅपलाचा iPhone 16 Pro ची क्रेझ दिसत आहे. मुंबई, दिल्लीत हा आयफोन घेण्यासाठी रांगाही लागल्या होत्या. कंपनीने या लेटेस्ट सीरीजमध्ये अनेक अपग्रेड फिचर्स दिले आहेत. तसेच त्यात अ‍ॅपलचे इंटेलिजन्ससुद्धा दिले आहे. कंपनीच्या या नवीन फीचरची भुरळ अनेकांना पडली आहे. परंतु भारतात जन्मलेले टेक एग्झीक्यूटीव्ह आदित्य अग्रवाल यांना iPhone 16 Pro आवडला नाही. त्यांनी त्याला ‘वेस्ट ऑफ टाइम’ म्हटले आहे.

‘वेस्ट ऑफ टाइम’ आहे आयफोन 16 प्रो

आदित्य अग्रवाल यांना आयफोन 16 प्रोमधील फीचर्स आवडलेले दिसत नाहीत. त्यांनी म्हटले, मी iPhone 14 Pro ला iPhone 16 Pro मध्ये अपग्रेड केले. या दोघांमध्ये मला फारसा फरक दिसला नाही. नवीन फोन सेट करण्यासाठी मला 24 तास लागले. त्यामुळे हा फोन म्हणजे वेळेचा अपव्यय आहे, असेच वाटते. मला अजूनपर्यंत अ‍ॅपलचे इंटेलिजन्स समजले नाही. ते काय काम करत आहे, हे मी समजू शकलो नाही.

हे सुद्धा वाचा

आदित्यच्या लग्नात आले होते मार्क झुकरबर्ग

आदित्य अग्रवाल यांच्या लग्न 2010 मध्ये गोव्यात झाले होते. त्या लग्नाला फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकरबर्ग आले होते. आदित्य यांनी फेसबुकमध्ये दीर्घकाळ प्रॉडक्ट इंजिनिअर डायरेक्टर म्हणून काम केले आहे. त्यांनी ड्रॉपबॉक्समध्ये सीटीओ पदावर काम केले आहे. आदित्य अग्रवाल यांनी केलेल्या X वरील पोस्टला लाखो लोकांनी पाहिले आहे. अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात काही युजरने अ‍ॅपलचे इंटेलिजन्स अजून आले नाही, असे उल्लेख केला आहे. ते अ‍ॅपलकडून दिलेले आश्वासन आहे. काही युजरने नवीन फोन घेणे ही काय हुशारी नाही, असे म्हटले आहे.

काय आहेत नवीन फीचर्स

अ‍ॅपलच्या नवीन iPhone 16 Pro मध्ये 6.3-इंचाचा LTPO सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे. जो 120 Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात A18 Pro बायोनिक चिपसेट आहे. 16 Pro मध्ये 48MP मुख्य कॅमेरा, 12MP पेरिस्कोप टेलीफोटो आणि 48MP अल्ट्रावाइड सेन्सर आहे.

राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.
'मोदी तो गयो...', संजय राऊत यांची भाजपवर जोरदार टीका, नेमक काय म्हणाले
'मोदी तो गयो...', संजय राऊत यांची भाजपवर जोरदार टीका, नेमक काय म्हणाले.
चेंबूरमध्ये मध्यरात्री आग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू
चेंबूरमध्ये मध्यरात्री आग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू.
भाजपचे राजेंद्र गावित,शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक
भाजपचे राजेंद्र गावित,शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक.